जळगाव जिल्हा परिषदेत अनेक पदे रिक्त

जळगाव जिल्हा परिषदेत अनेक पदे रिक्त
जळगाव जिल्हा परिषदेत अनेक पदे रिक्त

जळगाव ः जिल्हा परिषदेत सर्वच विभागांमध्ये वर्ग २ व वर्ग ३ संवर्गातील पदे रिक्त असून, कामकाज करताना अडचणी येत आहेत. वर्ग ३ संवर्गासंबंधी भरती प्रस्तावित आहे. परंतु प्रत्यक्षात नियुक्ती केव्हा होईल, याची प्रतीक्षा आहे. 

पशुसंवर्धन, पाणीपुरवठा, लघुसिंचन, बांधकाम या विभागांमध्ये वर्ग २ संवर्गाची सुमारे ४३ पदे रिक्त आहेत. पशुसंवर्धन विभागात पशुवैद्यकीय अधिकारी यांची पदे रिक्त असल्याने पशुधन उपचारासंबंधी अडचणी येतात. एका अधिकाऱ्यावर दोन पशुवैद्यकीय दवाखान्यांचा कार्यभार आहे. लघुसिंचन, ग्रामीण पाणीपुरवठा व बांधकाम विभागांमध्ये अभियांत्रिकीसंबंधीची पदे रिक्त असल्याने कामांवर परिणाम होतो. काही पदे प्रतिनियुक्ती करून कामकाज चालविले जात आहे. दोन वर्ग २ चे अधिकारी उपविभाग स्तरावर नियुक्त आहेत. परंतु, त्यांना प्रतिनियुक्तीने मुख्यालयात विविध जबाबदाऱ्या वरिष्ठांनी सोपविल्या आहेत. वर्ग ३ संवर्गात लिपिकांची अनेक पदे रिक्त आहेत. 

शिक्षण, आरोग्य, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, समाज कल्याण विभागात अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे कामकाजात अडथळे येतात. यातच संबंधित कर्मचारी पाच ते सहा दिवस रजेवर गेल्यास कामकाजाचा खोळंबा होऊन फायली साचतात. शिक्षण विभागात तीन कर्मचारी प्रतिनियुक्तीने मुख्यालयात कामकाजासाठी नियुक्त केले आहेत. 

आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकाऱ्यांची ८० टक्के म्हणजेच सुमारे १८ पदे रिक्त आहेत. एमबीबीएस पदवी असलेले वैद्यकीय अधिकारी जिल्हा परिषदेच्या सेवेत येण्यास तयार नसतात. काही अधिकारी सेवेत येतात, पण नंतर दीर्घ रजेवर जातात. यामुळे संबंधित पदांवर काम होत नाही. ग्रामीण वैद्यकीय सेवेवर यामुळे मोठा परिणाम होतो, असे जिल्हा परिषदेतील सदस्यांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com