शिवरायांच्या स्वराज्यापासून महात्मा गांधीजींही प्रेरित ः राष्ट्रपती कोविंद

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यापासून गांधीजीही प्रेरित होते. किल्ले रायगडाला भेट देणे ही प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.
Inspired by Mahatma Gandhi from Shivaraya's Swarajya: President Kovind
Inspired by Mahatma Gandhi from Shivaraya's Swarajya: President Kovind

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यापासून गांधीजीही प्रेरित होते. किल्ले रायगडाला भेट देणे ही प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या निमंत्रणानुसार राष्ट्रपती कोविंद यांनी दुर्गराज रायगडाला सोमवारी (ता. ६) भेट देली. यावेळी राष्ट्रपती कोविंद यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली वाहिली. 

आज किल्ले रायगडाची केलेली यात्रा मी तीर्थक्षेत्र मानतो. किल्ले रायगडावर येऊन मला खूप आनंद झाला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे आभार, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या अभिभाषणात नमूद केले. राष्ट्रपतींसोबत त्यांच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, खासदार संभाजीराजे छत्रपती आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी आयोजित प्रदर्शनाला राष्ट्रपतींनी भेट देऊन दोन पुस्तकांचे प्रकाशनही केले. राष्ट्रपती कोविंद यांनी गडावर आधारित माहितीपटाचे प्रकाशनही केले. यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रपती यांना तलवार भेट दिली. राष्ट्रपती कोविंद यांनी गडावर आल्यानंतर प्रथम होळीच्या माळरान येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर राजसदरेवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन केले. समाधी स्थळावर आपल्या कुटुंबासह जाऊन ते नतमस्तक झाले.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com