Insect attack on crops due to cloudy weather
Insect attack on crops due to cloudy weather

ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडींचा हल्लाबोल

परभणी, हिंगोली जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून सततच्या ढगाळ वातावरणामुळे तूर, रब्बीतील हरभरा, तसेच संत्रा, मोसंबी आदी फळपिकांवर किडींचाप्रादुर्भाव झाल्याचे आढळून येत आहे.

परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून सततच्या ढगाळ वातावरणामुळे तूर, रब्बीतील हरभरा, तसेच संत्रा, मोसंबी आदी फळपिकांवर किडींचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येत आहे. किडींच्या वाढीसाठी पोषक वातावरण असल्यामुळे कीड नियंत्रणावरील खर्च वाढला आहे.

मागील काही दिवसांपासून या दोन जिल्ह्यांत ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडत आहे. तापमानात चढ-उतार होत आहेत. कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तूर पीक फुलोरा ते शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. फुलगळ सुरू आहे. शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. हरभरा पीक वाढीच्या अवस्थेत आहे. त्यावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. संत्रा, मोसंबी आदी फळपिकांवर रसशोषण करणाऱ्या काळ्या माशीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येत आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे अनेक भागांत कीड आर्थिक नुकसान पातळी ओलांडण्याच्या स्थितीत आहे. विविध भाजीपाला पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

ढगाळ वातारवरणामुळे तुरीत फुळगळ होत आहे. शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढतो. फळपिकांवर मोसंबी, संत्र्यावर काळ्या माशीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. - डॉ. डी. डी. पटाईत, कीटकशास्त्रज्ञ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

सततच्या ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर पाने खाणाऱ्या अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. अळी नियंत्रणात येत नसल्याने नुकसानीची व्याप्ती वाढली आहे. - प्रताप काळे, धानोरा काळे, ता. पूर्णा, जि. परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com