शेतमालाला मार्केटिंगची जोड दिल्याने उत्पन्न वाढले

aruna shelke
aruna shelke

अकोला : जो शेतमाल पिकवला त्याची स्वतः विक्री व्यवस्था उभी केली. शेतकऱ्यांचे गट तयार झाले. शेतकऱ्यांचे संघटन उभे राहिले. यातून प्रत्येक शेतकरी सक्षम होऊ शकतो हे आमच्या अनुभवातून सिद्ध झाले, अशी मते ‘थेट विक्रीव्यवस्था’ या परिसंवादात शेतकरी वक्त्यांनी मांडली. येथे आयोजित २० व्या महाराष्ट्र सिंचन परिषदेत ‘थेट विक्रीव्यवस्थ’ या विषयावर अ. गो. पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा सत्र झाले. यात अभिनव ग्रुपच्या सदस्या अरुणा शेळके, शैलेंद्र गाताडे, संतोषी मारणे, अशोक शेवते, भूषण राऊत, संदीप भरणे सहभागी झाले होते. अरुणा शेळके म्हणाल्या, ‘‘आज मार्केटिंग करणे कठीण नाही. आम्हांला असंख्य अडचणी आल्या. पण चर्चा केल्या. यातून उपाय शोधले. पॅकिंगवर जोर दिला. यासाठी वेगवेगळे गट उभे केले. विक्रीसाठी ॲप बनविले. त्यावर आता ऑर्डर येतात. आता केवळ भाजीपाला नव्हे तर फळे, कडधान्य, धान्य, दूध, तूप देतो. ग्राहकाला निरोगी आरोग्यासाठी आम्ही अन्नधान्य पुरवितो.’’  शैलेंद्र गाताडे म्हणाले, ‘‘विषमुक्त अन्न पिकवण्याचा प्रयोग केला. अभिनवने अडीच लाख शेतकरी जोडले, त्यांना उभे केले. आज आम्ही एक एकरात सात ते आठ लाखांचे उत्पन्न घेतो. सहा राज्यात ही चळवळ पोचली.’’  संतोषी मारणे म्हणाल्या, ‘‘कमी पाण्याचा वापर करीत भाजीपाला उत्पादन सुरू केले. पिकवलेल्या मालाला मार्केटिंगची जोड दिली.’’ अशोक शेळके म्हणाले, ‘‘कुटुंबाकडे ३० गुंठे शेती आहे. सहा जणाचे कुटुंब यावर राबते. हळद व आंतरपीक म्हणून विविध भाजीपाला पिकवतो. त्याची आम्ही स्वतः विक्री करतो. त्यामुळे ३० गुंठे शेतीतून लाखोंचे उत्पन्न मिळवतो. भूषण राऊत यांनी मार्केटिंग बाबत माहिती दिली. संदीप भरणे यांची भाजीपाला विक्रीची यशोगाथा दाखविण्यात आली. अध्यक्षीय मनोगतात अ. गो. पुजारी यांनी शेतमालाला मार्केटिंगची जोड मिळाल्यानंतर शेतकरी अधिक मिळकत करीत आहेत. हे काम वाढले पाहिजे. शेतमालाला मॉलची जोड देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com