परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत परभणी येथे कृषी हवामान बदल संशोधन केंद्र स्थापनेचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून शासनाकडे प्रलंबित आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने गतवर्षी त्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली. त्यावर गांभीर्याने विचार केला गेला नाही. राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली नसल्यामुळे हवामान बदल संशोधन केंद्राचे घोडे अडलेले आहे.
मराठवाड्यात जिरायती शेतीचे क्षेत्र मोठे आहे. या भागातील शेतकऱ्यांना सातत्याने दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, वाढते तापमान या नैसर्गिक संकटांना तोंड देत शेती करावी लागते. ग्रामस्तरावर शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर हवामान सल्ला पोहोचविण्यासाठी विद्यापीठातील सध्याची यंत्रणा अपुरी पडत आहे. मराठवाडा विभागासाठी स्वतंत्र कृषी हवामान संशोधन केंद्राची गरज लक्षात घेऊन पाच वर्षांपूर्वी परभणी येथे कृषी हवामान बदल संशोधन केंद्र स्थापनेचा प्रस्ताव महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडे सादर केला होता. त्यास २०२१ फेब्रुवारी महिन्यात कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मात्र त्यापुढे त्यात प्रगती दिसत नाही.
राज्याच्या अर्थसंकल्पात यंदा परभणी कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ५० कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच हवामान बदल संशोधन केंद्रास मंजुरी देऊन निधीची तरतूद आवश्यक होती. मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी या केंद्रासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे.
हवामान बदल संशोधन केंद्राची उद्दिष्टे
बदलत्या हवामान परिस्थितीत मराठवाड्यातील वातावरणात तग धरणारे वाण, पीक पद्धतीवर संशोधनासाठी या केंद्राची गरज आहे. त्यावर गांभीर्याने विचार व्हावा प्रस्तावास मंजुरी द्यावी. पुरेसा निधी तत्काळ उपलब्ध करून द्यावा. - डॉ. अशोक ढवण, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.