विदर्भ राज्य समितीकडून वीजबिलांची होळी

विदर्भ राज्य समितीकडून वीजबिलांची होळी
विदर्भ राज्य समितीकडून वीजबिलांची होळी

नागपूर ः एसएनएनडीएल कंपनी बरखास्तीसोबतच वीजबिल माफीच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. जुने काटोल नाकास्थित वीज कंपनीच्या कार्यालयासमोर या वेळी वीजबिलाची होळी देखील करण्यात आली. 

वीज उत्पादन विदर्भात करण्यात येते. या माध्यमातून अनेक समस्या आणि आजारांचा सामना या भागातील नागरिकांना वीज निर्मिती प्रकल्पामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे करावा लागत आहे. असे असताना वीज दरात कोणतीच सवलत किंवा कंपन्यांकडून या भागात पायाभूत सुविधाकरिता सीएसआर निधी उपलब्ध करून दिला जात नाही. सरकारने वीज प्रकल्प असलेल्या विदर्भात वीजबिल निम्मे करावे अन्यथा विदर्भातून चालते व्हावे. 

दिल्लीत प्रती युनीट १.२५ पैसे असा दर असताना महाराष्ट्रात मात्र हाच दर ५.१० पैसे कसा ? दिल्लीत ५०० युनीट वापरासाठी ३.५० पैसे तर महाराष्ट्रात ११.५७ पैसे इतका प्रचंड दर कसा? असा प्रश्‍नही समितीने उपस्थित केला आहे. सरकारने त्वरित विजेचे दर निम्मे करावे अन्यथा विदर्भातील जनता रस्त्यावर उतरले. मीटरचे पैसे घेणे किंवा मिटर भाडे घेणे, स्थिर आकार लावणे, वीज शुल्क लावणे, वीज वहन कर आकारणी, इतर भार, अधिभार हे सर्व अन्यायकारक असून ही वीज ग्राहकांची लूट असल्याचा आरोपही समितीचे संयोजक राम नेवले यांनी या वेळी केला. 

या वेळी वीजबिलाची प्रतीकात्मक होळी करण्यात आली. आंदोलनात डॉ. श्रीनिवास खांदेवाले, मुकेश मासूरकर, विजया धोटे, प्रतिभा खापर्डे, रजनी शुक्‍ला, विजय मौदेकर, ॲड. निरज खांदेवाले, प्रफुल्ल शेंडे, लक्ष्मण कापरवार, तमीजा शेख उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com