ताहाराबाद येथे दीड लाख रुपयांच्या कांद्याची चोरी

ताहाराबाद येथे दीड लाख रुपयांच्या कांद्याची चोरी
ताहाराबाद येथे दीड लाख रुपयांच्या कांद्याची चोरी

नाशिक  : सटाणा तालुक्यातील अंतापूर येथील रावेर शिवारात रविवारी (ता. ३) रात्री मुस्ताक इसाक शेख यांच्या कांद्याच्या चाळीतून १ लाख ३० हजार रुपये किमतीचा कांदा चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत जायखेडा पोलिस ठाण्यामध्ये चोरीबाबत तक्रार दाखल झाली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक एस. के. पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.  मिळालेल्या माहितीनुसार ताहाराबाद- अंतापूर रस्त्यावरील रावेर शिवारातील गट नंबर.२३ मधील रस्त्यालगत मुस्ताक शेख यांची कांद्याची चाळ आहे. रविवार (ता. ३) रात्री अज्ञात चोरट्यांनी वाहन आणून सोबत ६२ कांदा गोणी पैकी चाळीस गोणी आणलेल्या वाहनात टाकून पोबारा केला आहे. सोमवार (ता. ४) रोजी सकाळी लुकमान शेख शेतात आल्यानंतर त्यांना लोखंडी गेटचे साखळी, कुलूप तोडलेली दिसले. त्या वेळी त्यांच्या लक्षात आले असता त्यांनी जायखेडा पोलिस स्टेशनची संपर्क साधून साहेब पोलिस निरीक्षक श्री. पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पी. एम. पवार यांनी मोहन महाजन, लुकमान शेख, अदनान शेख, भगवान माळी यांच्यासमक्ष पंचनामा केला. याअगोदर अंतापूर- मुल्हेर रस्त्यावरील आनंदा लाला गवळी यांच्या गट नंबर. ३४७ मध्ये उभे असलेल्या दोन ट्रॅक्टरच्या बॅटरी, संजय पानपाटील यांच्या वीस शेळ्या, साहेबराव साताळे यांची एक मोटरसायकल यांच्यासह अनेक शेती उपयोगी साहित्य, उत्पादने चोरी जात असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पावसामुळे झालेल्या पिकांचे नुकसान व रात्री पहाटे होणाऱ्या चोऱ्या यांमुळे दुष्काळात तेरावा महिना उभा राहिला आहे.

चोऱ्याचा तपास करण्याची मागणी  जायखेडा पोलिस स्टेशन अंतर्गत मोसम-करंजाडी खोऱ्यातील ९२ गावे आहेत. पोलिस संख्याबळ कमी असल्याने अशा लहानमोठ्या गुन्ह्यांचे व चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शासनाने अधिक पोलिस बळ व गस्त वाढवून आत्तापर्यंत झालेल्या चोऱ्यांचा तपास लावून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अंतापूर येथील माजी उपसरपंच साहेबराव गवळी यांनी केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com