राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस

राज्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली असली तरी काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अजूनही धुमाकूळ सुरूच आहे. मंगळवारी (ता. २०) सायंकाळी मुंबईसह पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.
Heavy rains in sparse places in the state
Heavy rains in sparse places in the state

पुणे ः राज्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली असली तरी काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अजूनही धुमाकूळ सुरूच आहे. मंगळवारी (ता. २०) सायंकाळी मुंबईसह पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.

खालापूर, माणगाव, सावंतवाडी, तलासरी, लांजा भागात पावसाने अक्षरशः धुऊन टाकले. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढत असून या पावसामुळे काढणी केलेली भात भिजली असून अनेक ठिकाणी काढलेली भात भिजत आहेत. पावसामुळे अजूनही ओढे नाले खळाळून वाहत असल्याने भात पिकांच्या नुकसानीत वाढ होऊ लागली आहे.

या पावसामुळे खरिपातील पिके मातीमोल झाली आहेत. त्यात पुन्हा भर पडत असल्याने शेतकरी अडचणीत आला असून सरकारने मदत करावी, अशी मागणी जोर धरत आहे. गेल्या महिन्यापासून सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकणात पावसाचा कमीअधिक असल्याने भात काढणी खोळंबत असल्याची स्थिती आहे.

मध्य महाराष्ट्रात दिवसभर ऊन पडत असले तरी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होत आहे. सायंकाळी काही ठिकाणी काळेकुट्ट ढग जमा होत आहे. त्यामुळे जोरदार पाऊस पडत असून कमी वेळात जास्त पाऊस पडत आहे. काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होत आहे. सकाळपासून शेतकरी कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर काढणीच्या कामाला लागला आहे. मात्र, काही ठिकाणी अजूनही शेतात पाणीच पाणी असल्याने पीक हातातून गेल्याने शेतकरी शेतात फिरकत नसल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत. मात्र, त्याला फारसा वेग नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी जोर धरू लागली आहे.  

बुधवारी (ता. २१) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस, मिलिमीटर ः (स्रोत - हवामान विभाग) कोकण : कुलाबा ३३, डहाणू २५.३, मोखेडा १८.८, तलासरी ३२.२, खालापूर ३०, माणगाव ३८, चिपळूण २३, लांजा ३७, राजापूर १३, रत्नागिरी १२.३, संगमेश्वर ११, कणकवली २३, कुडाळ १९, सावंतवाडी ४६. मध्य महाराष्ट्र ः अकोले १३, पारनेर २८, राहता १६, राहुरी १९, संगमनेर २७, शेवगाव १३, श्रीरामपूर २५, भुसावळ ११, जामनेर २९, आजरा ४०, चंदगड २०, गगणबावडा २४, हातकणंगले १८, कागल २४, करवीर १४.८, पन्हाळा ३०, राधानगरी ११ , शाहूवाडी २८, शिरोळ ५५, हर्सूल ३९.४, मुल्हेर १४, ओझरखेडा ३६.८, सिन्नर १०, सुरगाणा ५७.२, त्र्यंबकेश्वर १०, पुणे ४८.४, पुरंदर २३, जत १५, कवठेमहांकाळ ३६, मिरज ३५.४, पलुस ३२, सांगली ४५.६, शिराळा ३६, तासगाव ३३, वाळवा १७, कराड १२. मराठवाडा : गंगापूर ५८, खुल्ताबाद १४. विदर्भ : सिरोंचा २२.२.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com