परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात रविवारी (ता.२) रात्री पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. अनेक भागात विजांच्या कडकडाटात काहीकाळ जोरदार पाऊस झाला. वीज कोसळून परभणी जिल्ह्यात तीन व्यक्तींचा मृत्यू झाला. चार जनावरे दगावली. तर हिंगोली जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृ्त्यू झाला. तर एक जनावर दगावले. वादळी वाऱ्यामुळे आंबा तसेच अन्य पिकांचे नुकसान झाले. शेतामध्ये वाळवत ठेवलेली हळद भिजून मोठे नुकसान झाले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी हवामानशास्त्र विभागाच्या वेधशाळेत सोमवारी (ता.३) सकाळी ८.२ मिमी पावसाची नोंद झाली. परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, पूर्णा, पालम, गंगाखेड, मानवत, सेलू, पाथरी, सोनपेठ आदी तालुक्यातील अनेक भागात रविवारी (ता.२) सायंकाळी तसेच रात्री विजांच्या कडकडाटात हलका ते जोरदार पाऊस झाला. वीज कोसळून तरोडा (ता. परभणी) शिवारात दोन मुले, तर सोनपेठ तालुक्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
पेठपिंपळगाव (ता.पालम) शिवारात दोन बैल, पू्र्णा, सेलू तालुक्यात प्रत्येकी एक जनावर दगावले. आंबा, हळदीसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. हिंगोली जिल्ह्यातील वसमत औंढा तालुक्यातींल अनेक गावांत विजांच्या कडकडात पाऊस झाला. वीज कोसळून पुयनी (ता. वसमत) शिवारात हळद झाकून ठेवल्यानंतर झाडाखाली थांबलेल्या ५० वर्षेीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. हट्टा येथील शेतकऱ्याचा बैल दगावला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.