सातारा जिल्ह्यात संततधार पाऊस 

सातारा जिल्ह्यात संततधार पाऊस 
सातारा जिल्ह्यात संततधार पाऊस 

सातारा : जिल्ह्यात संततधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. पश्चिम भागात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांचे पाणी गावात घुसल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. दुष्काळी माण, खटाव, फलटण तालुक्यांतही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस थांबत नसल्याने पिके धोक्यात येऊ लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांत चितेंचे ढग निर्माण झाले आहेत. पश्चिम भागातील नदी काठच्या पिके पाण्याखाली गेली आहेत. दोन दिवसांपासून पिके पाण्यात असल्याने पिके कुजणार आहेत. तसेच, शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने सोयाबीन पिवळी पडू लागली आहेत. तसेच कृषिपंप, फ्यूजबॅाक्स पाण्यात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. उसात भरमसाट पाणी साठले आहे. 

पावसाची अशीच परिस्थिती राहिल्यास पिके हातची जाणार असल्याने किमान पाण्याखाली गेलेली तसेच पाणी साचून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे त्वरीत करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. धरणात पाणीसाठा अतिरिक्त होऊ नये यासाठी सर्व प्रमुख धरणांत पाण्याचा विसर्ग सुरू ठेवल्याने कृष्णा, कोयना, उरमोडी, वेण्णा नद्या दुथडी भरून वाहत असल्याने अनेक गावांत तसेच शेतात पाणी घुसले आहे. प्रशासनाकडून नदीवरील पुलावरून वाहतूक बंद ठेवली आहे. २४ तासांत सरासरी ६८.५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com