वऱ्हाडात पावसाची दमदार हजेरी

यंदा मृग नक्षत्रातच पावसाने काही ठिकाणी जोरदार हजेरी दिल्याने शेतीतील कामांनी वेग घेतला आहे. काही भागांत बुधवारी (ता. ९) पेरणीचेही काम शेतकऱ्यांनी हातात घेतल्याचे दिसून आहे.
Heavy rain showers at the wedding
Heavy rain showers at the wedding

अकोला ः यंदा मृग नक्षत्रातच पावसाने काही ठिकाणी जोरदार हजेरी दिल्याने शेतीतील कामांनी वेग घेतला आहे. काही भागांत बुधवारी (ता. ९) पेरणीचेही काम शेतकऱ्यांनी हातात घेतल्याचे दिसून आहे. मंगळवारी (ता. ८) दुपारपासूनच पावसाचे वातावरण बनले होती. रात्रीच्या सुमारास वेगवेगळ्या भागात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त आहे.

यंदा मॉन्सूनचे आगमन जोमाने झाले आहे. मृग नक्षत्रात येणारा पाऊस हंगामाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. या नक्षत्रातील पेरणी शेतकरी महत्त्वाची मानतात. अकोला जिल्ह्यात बार्शीटाकळी तालुक्यात सरासरी ११.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पातूरमध्ये सात, बाळापूर चार, तेल्हारा पाच, अकोला ५.१ पाऊस नोंद झाला. बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद, संग्रामपूर, खामगाव, मेहकर, चिखली, लोणार, देऊळगावराजा, अशा विविध तालुक्यांमध्ये काही गावांमध्ये दमदार पावसाने हजेरी दिली.

पेरणीला सुरुवात पाऊस दमदार झाल्याने जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यात काही शेतकऱ्यांनी पेरणीसुद्धा हातात घेतली. बैलजोडीच्या साह्याने तिफणीने सोयाबीन, तूर, मूग, उडीद पेरणीसाठी शेतकरी सकाळपासूनच कामाला लागल्याचे दिसून आले.  या भागात प्री-मॉन्सून लागवड केलेल्या कपाशीच्या पिकाला पावसामुळे संजीवनी मिळाली आहे. बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण बनलेले होते. आणखी दोन दिवसांत पाऊस झाल्यास सार्वत्रिक पेरण्यांना सुरुवात होण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com