शेतकऱ्यांच्या रागाचा मुख्यमंत्री खट्टर यांना फटका; सभास्थानाची मोडतोड

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या रागाचा फटका रविवारी (ता.10) हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना बसला.
शेतकऱ्यांच्या रागाचा मुख्यमंत्री खट्टर यांना फटका; सभास्थानाची मोडतोड
शेतकऱ्यांच्या रागाचा मुख्यमंत्री खट्टर यांना फटका; सभास्थानाची मोडतोड

कर्नाल : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या रागाचा फटका रविवारी (ता.10) हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना बसला. या कायद्यांचे फायदे सांगण्यासाठी त्यांनी कर्नाल जिल्ह्यात आयोजित केलेल्या ‘किसान महापंचायत’ या कार्यक्रमाच्या ठिकाणी घुसत आंदोलक शेतकऱ्यांनी सभास्थानाची मोडतोड केली आणि परिसरात असलेले तंबूही उखडून टाकले. यामुळे खट्टर यांना हा कार्यक्रमच रद्द करावा लागला.   खट्टर यांच्या आज होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त पोलिसांनी जिल्ह्यातील कैमला गावात कडक बंदोबस्त ठेवला होता. सभास्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेड्‌स लावून आंदोलकांना रोखले जात होते. यासाठी सात तपास नाक्यांवर १५०० पोलिस सज्ज ठेवण्यात आले होते. मात्र तरीही आंदोलक शेतकऱ्यांनी सहा तपास नाक्यांवरील सुरक्षा भेदून खट्टर यांचे हेलिकॉप्टर उतरणार असलेल्या हेलिपॅडचा ताबा मिळविला. यामुळे अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर लँडिंगसाठी दुसरी जागा शोधावी लागली. नंतर शेतकऱ्यांनी कार्यक्रमस्थळी जात तोडफोड सुरु केली. या ठिकाणी आधीपासूनच सुमारे दोन हजार शेतकरी खट्टर यांची वाट पहात होते. यातील बहुसंख्य भाजप समर्थक असल्याचे सांगितले जाते. मात्र, आंदोलक शेतकऱ्यांनी खुर्च्या फेकून दिल्या, बॅनर फाडले आणि सभास्थानाचीही मोडतोड केली. यानंतर खट्टर यांनी कार्यक्रम रद्द केल्याची घोषणा केली. 

शेतकऱ्यांवर पाण्याच्या फवाऱ्याचा मारा  चंडीगड : कर्नाल जिल्ह्यातील कैमला गावाकडे निघालेल्या आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी हरियाना पोलिसांनी पाण्याच्या फवाऱ्याचा मारा केला, तसेच अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. हे सर्व जण किसान महापंचायत रोखण्यासाठी निघाले होते. या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवत राज्य सरकारचा निषेध केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com