औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी ११ केंद्रे प्रस्तावित

औरंगाबाद : जिल्ह्यातील ११ केंद्रे मक्याच्या हमीभावातील खरेदीसाठी प्रस्तावित करण्यात आली आहेत. दुसरीकडे उडीद, मूग, सोयाबीनच्या हमी दराने खरेदीला मात्र प्रतिसाद नसल्याची स्थिती आहे.
Guaranteed in Aurangabad district 11 centers proposed for purchase of maize
Guaranteed in Aurangabad district 11 centers proposed for purchase of maize

औरंगाबाद : जिल्ह्यातील ११ केंद्रे मक्याच्या हमीभावातील खरेदीसाठी प्रस्तावित करण्यात आली आहेत. दुसरीकडे उडीद, मूग, सोयाबीनच्या हमी दराने खरेदीला मात्र प्रतिसाद नसल्याची स्थिती आहे.

गत वर्षी पहिल्यांदा रब्बी हंगामातील मक्याची १७६० रुपये किमान आधारभूत दराने खरेदीसाठी आठ केंद्रे सुरु करण्यात आली होती. पहिल्यांदाच रब्बी हंगामातील मका खरेदीसाठी ही केंद्रे सुरू करण्यात आली. या केंद्रावरून खरेदी केलेल्या मक्याचे चुकारे उशिरा शेतकऱ्यांच्या पदरी पडले.  त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.

आता पुन्हा एकदा सुधारित १८५० रुपये दराने खरेदीसाठी ११ केंद्रे प्रस्तावित आहेत. त्यामध्ये कन्नड, पिशोर, लातूर, गंगापूर, तुर्काबाद, खराडी, वैजापूर, खुलताबाद, करमाड, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव आदी अकरा केंद्रांचा समावेश आहे. मक्याच्या खरेदीसाठी एक नोव्हेंबरपासून नोंदणी सुरू होणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील औरंगाबाद, गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, कन्नड, सोयगाव, फुलंब्री आदी ६ केंद्रांवरून यंदा सोयाबीन, मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

सोयाबीनच्या खरेदीसाठी एका शेतकऱ्याची नोंदणी झाली होती. परंतु, त्याला एसएमएस पाठविल्यानंतर त्याच्याकडून खरेदीसाठी प्रतिसादच मिळाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

खरेदीचा प्रश्‍न कायम

सोयाबीनसाठी १ ऑक्टोबरपासून, तर उडीद, मूगासाठी १५ सप्टेंबरपासून नोंदणी सुरू झाली होती. गत रब्बी हंगामातील खरेदी केलेल्या मात्र प्रत्यक्ष ऑनलाइन नोंदणी होऊ न शकलेल्या जवळपास ८१ शेतकऱ्यांच्या मक्याच्या खरेदीचा प्रश्न कायम आहे. त्यावर तोडगा कधी निघतो, याची प्रतीक्षा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com