खानदेशात भुईमूग लागवड वाढणार

खानदेशात भुईमुगाची लागवड यंदा वाढणार आहे. ही लागवड सुमारे १०० ते १५० हेक्टरने वाढू शकते. भुईमुगाचे चांगले उत्पादन घेतले जात होते. परंतु दुष्काळी स्थिती आणि दरांची समस्या यामुळे लागवड जळगाव, धुळ्यात घटली. परंतु गेल्या वर्षी लागवड सुमारे ५० हेक्टरने खानदेशात वाढली होती.
Groundnut cultivation will increase in Khandesh
Groundnut cultivation will increase in Khandesh

जळगाव ः खानदेशात भुईमुगाची लागवड यंदा वाढणार आहे. ही लागवड सुमारे १०० ते १५० हेक्टरने वाढू शकते. भुईमुगाचे चांगले उत्पादन घेतले जात होते. परंतु दुष्काळी स्थिती आणि दरांची समस्या यामुळे लागवड जळगाव, धुळ्यात घटली. परंतु गेल्या वर्षी लागवड सुमारे ५० हेक्टरने खानदेशात वाढली होती. दर ओल्या शेंगांना प्रतिक्विंटल चार हजार रुपये, एवढा मिळाला होता. तर वाळविलेल्या शेंगांनाही प्रतिक्विंटल पाच ते साडेपाच हजार क्विंटल दर होता.

अलीकडे ठिबक, गादीवाफा पद्धतीचा वापर वाढल्याने अनेक शेतकरी एकरी १८ ते २० क्विंटल एवढे ओल्या शेंगांचे उत्पादन घेऊ शकत आहेत. यामुळे पीक बऱ्यापैकी परवडले देखील होते. लागवडीसाठी यंदाही पाल (ता. रावेर) येथील कृषी विज्ञान केंद्र, जळगाव कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग पुढाकार घेणार आहे.

खानदेशात कृषी विज्ञान केंद्रांच्या मदतीने सुमारे ३० ते ३५ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम राबविला जाणार आहे. तर कृषी विभागही तेलताड कार्यक्रमातून बियाणे, निविष्ठा वितरणाचा प्रयत्न करणार आहे. खानदेशात गेल्या वर्षी सुमारे १५० हेक्टरवर भुईमुगाची लागवड झाली होती. यंदा ही लागवड सुमारे २५० ते ३०० हेक्टरपर्यंत पोहोचू शकते. कारण गेल्या वर्षी लॉकडाउनमध्येच शेंगांची काढणी झाली. बाजार समित्यांमध्ये हवे तसे दर मिळाले नव्हते. यंदा मात्र लॉकडाऊनची समस्या राहणार नाही, अशी स्थिती आहे.

यामुळे इतर शेतकरीदेखील भुईमुगाकडे वळतील. लागवड जानेवारीत सुरू होईल. लागवड जळगावमधील चोपडा, यावल, पाचोरा, जामनेर, धुळ्यातील शिरपूर, धुळे, नंदुरबारमधील तळोदा, नवापूर, शहादा भागांत होईल. हलक्या, मध्यम व काळ्या कसदार जमिनीतही भुईमूग लागवड अधिक होईल, असे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com