परभणीमध्ये हिरवी मिरची 2000 ते 2800 रुपये

परभणीमध्ये हिरवी मिरची 2000 ते 2800 रुपये
परभणीमध्ये हिरवी मिरची 2000 ते 2800 रुपये

परभणी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.12) हिरव्या मिरचीची 40 क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल 2000 ते 2800 रुपये दर होते, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

बाजार समितीत गाजराची 350 क्विंटल आवक झाली. गाजराला प्रतिक्विंटल 400 ते 800 रुपये दर होते. पालेभाज्यांमध्ये पालकची 30 क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल 300 ते 700 रुपये दर होते. मेथीच्या 30 हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा 150 ते 250 रुपये दर होते. शेपूची 10 क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल 600 ते 1000 रुपये दर होते. कोथिंबिरीची 90 क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल 300 ते 800 रुपये दर होते.

शेवग्याची 3 क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल 5000 ते 6000 रुपये दर होते. वाटाण्याची 70 क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल 1200 ते 2500 रुपये दर होते. फ्लॉवरची 30 क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल 1500 ते 2500 रुपये दर गोते. कोबीची 40 क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल 1200 ते 1500 रुपये दर होते.

फळांमध्ये पपईची 15 क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल 700 ते 1200 रुपये दर होते. पेरूची 6 क्विंटल आवक हेऊन प्रतिक्विंटल 1500 ते 2000 रुपये दर होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com