सरकारची शेतकऱ्यांना कोरडी आश्‍वासने : फडणवीस

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे ९० टक्के पंचनामे अपूर्ण आहेत. राज्य सरकार शेतकऱ्यांना केवळ कोरडी आश्वासने देत आहे. प्रसंगी कर्ज काढून मदत करता येते.परंतु सरकारची तशी नियत दिसत नाही. शेतकऱ्यांना तत्काळ थेट मदत दिली नाही तर रस्त्यावर उतरून सरकारशी संघर्ष करू, असा इशारा विधान सभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
Government's dry assurances to farmers
Government's dry assurances to farmers

जिंतूर, जि. परभणी, हिंगोली ः अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे ९० टक्के पंचनामे अपूर्ण आहेत. राज्य सरकार शेतकऱ्यांना केवळ कोरडी आश्वासने देत आहे. प्रसंगी कर्ज काढून मदत करता येते.परंतु सरकारची तशी नियत दिसत नाही. शेतकऱ्यांना तत्काळ थेट मदत दिली नाही तर रस्त्यावर उतरून सरकारशी संघर्ष करू, असा इशारा विधान सभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

श्री. फडणवीस अतिवृष्टीमुळे झालेल्या पीकनुकसाची पाहणी करण्यासाठी बुधवारी (ता. २१) परभणी, हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले होते. पाचेगाव (ता. जिंतूर) येथील शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, पंकजा मुंडे, आमदार मेघना साकोरे बोर्डीकर, जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम आदी उपस्थित होते.

श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, या राज्य सरकारच्या काळात कुठेही संवेदनशीलता दिसत नाही. बॅंका कर्जभरण्यासाठी शेतकऱ्यांना नोटिसा पाठवीत आहेत. सरकारकडून शेतकऱ्यांच्या तत्काळ मदतीची अपेक्षा होती. परंतु अद्याप दहा टक्केही पंचनामे पूर्ण झाले नाहीत. काही अधिकारी शेतकऱ्यांशी मग्रुरीने वागत आहेत. विमा कंपन्यांकडून अडवणूक केली जात आहे. आर्थिक अडचणी सापडलेल्या शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठी तत्काळ मदतीची गरज आहे ती देण्यास सरकारला भाग पाडू, असे आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिले.

श्री. फडणवीस यांनी हिंगोली जिल्ह्यातही पीक नुकसानीची पाहणी केली. यावेळी यावेळी माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी आमदार गजानन घुगे, रामराव वडकुते, राम नागरे, शरद पाटील, पांडुरंग पाटील, सीताताई नागरे, सुरजीतसिंग ठाकूर, प्रा.गजाननराव कुटे, बबन सोनुने, गणेश देशमुख आदी उपस्थित होते.

हिंगोलीतील शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. २१) सकाळी हिंगोली जिल्ह्यातील आडगाव रंजेबुआ (ता. वसमत), जवळा बाजार, साळणा, माथा (ता. औंढानागनाथ) येथे भेटी देऊन अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांसोबत चर्चा करून व्यथा जाणून घेतल्या. माथा येथील शेतकरी लक्ष्मण कुटे यांच्या शेतातील उभ्या सोयाबीनची तर साळणा येथे शेतकरी आश्रुबा सांगळे यांच्या सोयाबीनची फडणवीस यांनी पाहणी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com