पीक विमा योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

पीक विमा योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ
पीक विमा योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : खरीप हंगाम 2019 मध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेत राज्यातील सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभाग होता यावे यासाठी योजनेसाठी अर्ज करण्यास आणखी दोन दिवस म्हणजे ३१ जुलै पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. योजनेअंतर्गत सुरुवातीला २४ जुलैपर्यंत अर्ज करता येणार होते, त्याला गेल्या आठवड्यात 29 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता पुन्हा दोन दिवस मुदत वाढवून देण्यात आली आहे.

योजनेत सहभागी होण्यासाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे विमा अर्ज बँक व `आपले सरकार सेवा केंद्र` (डिजीटल सेवा केंद्र) येथे स्वीकारण्यात येत आहेत. तरी शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत पीक विमा संरक्षण मिळण्यासाठी या मुदतीपुर्वी जवळची बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह आणि आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच याबाबत अधिक माहितीसाठी विभागीय कृषी सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि खात्याने केले आहे. खरीप हंगामातील पीक विमा भरण्यापासून राज्यातील लाखो शेतकरी अजून वंचित आहेत, हे लक्षात घेता शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी विमा भरण्यासाठी मुदत वाढ द्यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com