दूध उत्पादक कल्याणकारी संघाच्या अध्यक्षपदी गोपाळराव म्हस्के

गोपालराव म्हस्के
गोपालराव म्हस्के

पुणे ः महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या अध्यक्षपदी गोपाळराव म्हस्के यांची निवड करण्यात आली आहे. ते सध्या कात्रज दूध संघाचे संचालक आहेत. कात्रज दूध संघात बुधवारी (ता. २५) राज्य कल्याणकारी संघाच्या झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. 

संघाचे यापूर्वीचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला. त्यामुळे म्हस्के यांच्याकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले. संघाच्या नव्या कार्यकारिणी निवडीचे अधिकारदेखील म्हस्के यांना देण्यात आले. संघाच्या उपाध्यक्षपदी महानंदचे उपाध्यक्ष डी. के. जाधव यांची निवड करण्यात आली. या वेळी नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. म्हस्के म्हणाले की, शेतकऱ्यांना वर्षभर स्थिर व चांगला म्हणजेच किमान प्रतिलिटर २८ रुपये भाव देण्यासाठी माझा प्रयत्न राहील. सरकारने वर्षभर गायीच्या दुधाला तीन रुपये अनुदान देण्याची आवश्यकता आहे. अनुदानासाठीदेखील आमचे प्रयत्न चालू राहतील.

दरम्यान, दूध संघांचे सरकारी अनुदान रखडलेले आहे. अनुदान मागणाऱ्या संस्थांनी व्यवस्थित हिशेब सादर न केल्यामुळे अनुदान मंजूरीत अडचणी असल्याचे दुग्धविकास विभागाने सांगितले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com