गडकरींनी घेतले ‘सरांचे’ आशीर्वाद

गडकरींनी घेतले ‘सरांचे’ आशीर्वाद
गडकरींनी घेतले ‘सरांचे’ आशीर्वाद

नागपूर ः मेळाव्याच्या निमित्ताने नागपुरात आलेल्या माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या वेळी गडकरी यांनी त्यांचे चरण स्पर्श करीत आशीर्वाद मागितले. 

मनोहर जोशी देशपांडे सभागृहातील जाहीर व्याख्यानासाठी आले होते. त्यापूर्वी त्यांनी गडकरी यांच्या निवास्थानी त्यांची भेट घेतली. मनोहर जोशी घरी पोचताच गडकरी यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर दोघांमध्ये बराच वेळ विविध विषयांवर चर्चादेखील झाली. देशपांडे सभागृहातील या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. 

भाजप आणि शिवसेनेत युती झाल्याने दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित काम करून जनतेपर्यंत काम पोचवावे, अशी अपेक्षा श्री. जोशी व गडकरी यांनी चर्चेतून व्यक्‍त केली. 

तेव्हा मिळाली ओळख १९९६ मध्ये राज्यात युतीची सत्ता होती. मनोहर जोशी यांच्याकडे मुख्यमंत्री पद होते. सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी त्यांनी नितीन गडकरी यांच्याकडे दिली होती. त्या वेळी रस्ते बांधकामातील आघाडीमुळे गडकरी यांना एक गतिमान मंत्री ही ओळख मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com