नांदेड जिल्ह्यात मोफत वाटपासाठी प्रतिमहिना ५२८ टन डाळ मंजूर

नांदेड :जिल्ह्यातील १६ तालुक्यांना अंत्‍योदय अन्‍न योजनेतील ८० हजार १२४ शिधापत्रिकाधारक आणि प्राधान्‍य कुटुंब येाजनेतील ४ लाख १० हजार २०१ शिधापत्रिकाधारकांना मोफत डाळीचे वितरण करण्यासाठी प्रतिमाह ५२८ टन डाळ मंजूर करण्‍यात आली.
नांदेड जिल्ह्यात मोफत वाटपासाठी प्रतिमहिना ५२८ टन डाळ मंजूर
नांदेड जिल्ह्यात मोफत वाटपासाठी प्रतिमहिना ५२८ टन डाळ मंजूर

नांदेड : जिल्ह्यातील १६ तालुक्यांना अंत्‍योदय अन्‍न योजनेतील ८० हजार १२४ शिधापत्रिकाधारक आणि प्राधान्‍य कुटुंब येाजनेतील ४ लाख १० हजार २०१ शिधापत्रिकाधारकांना मोफत डाळीचे वितरण करण्यासाठी प्रतिमाह ५२८ टन डाळ मंजूर करण्‍यात आली. 

मोफत डाळ एपीएल शेतकरी व एपीएल केशरी लाभार्थ्यांना मिळणार नाही. सध्‍या जिल्‍हयातील नायगाव, मुदखेड तालुक्‍यात मोफत डाळीचे वितरण सुरु झाले आहे. उर्वरित तालुक्‍यात चालु आठवड्यात मोफत डाळीचे वितरण सुरु होईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली. 

जिल्ह्यातील बुधवार (ता.२०) पर्यंत मे महिन्याचे नियमीत अन्‍न धान्‍य वितरण १ हजार ९९३ रास्‍त भाव दुकानदारांकडून अंत्‍योदय योजनेत २ हजार ६६१, प्राधान्य कुटूंब योजनेचे ८ हजार १८२, एपीएल केशरी (शेतकरी) योजनेचे १ हजार ८२१ आणि एपीएल केशरी (एनपीएच) ६०६ असे एकूण १३ हजार २७० टन सर्व योजनेतील पात्र लाभार्थ्यांना नियमित धान्‍य वाटप झाले. पंतप्रधान गरीब कल्‍याण योजनेंतर्गत अंत्‍योदय अन्‍न योजना, प्राधान्‍य कुटुंब योजनेच्‍या लाभार्थ्‍यांना ४ हजार ५९२ मेट्रिक टन मोफत तांदुळ वितरण करण्‍यात आला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com