‘निसाका’ चालविण्यास पाच कंपन्या उत्सुक

‘निसाका’ चालविण्यास पाच कंपन्यां उत्सुक
‘निसाका’ चालविण्यास पाच कंपन्यां उत्सुक

नाशिक : नाशिक सहकारी साखर कारखाना व निफाड सहकारी साखर कारखान्यांकडे बँकेची अनुक्रमे १३८ आणि १४० कोटींची थकबाकी आहे. ही रक्कम एनपीएमध्ये गेल्याने या दोन्हीही कारखान्यांची जप्ती करून जप्त मालमत्तेच्या विक्रीसाठी तीन वेळा निविदा काढण्यात आल्या. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. आता पुन्हा बँकने दहा वर्षांसाठीचा भाडेकरार करण्याची निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यास पाच कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे निसाका सुरू होणार का, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.

प्रसिद्ध केलेल्या निविदेत ३५०० मेट्रिक टन प्रति दिन गाळपक्षमता असलेला साखरनिर्मिती प्रकल्प, १ मेट्रिक टन प्रतिदिन कॅल्शिअम लॅक्टेट प्लांट यांसह १५ केएलपीडी, डिस्टिलरी प्लांट (कॉपर), ३० केएलपीडी डिस्टिलरी प्लॉट (स्टील) यांचा समावेश आहे. मुंबर्इमधील टायचे इन्फ्रा.लि (मुंबई), मे.कृषी कल्याणी अग्रो लि.(नाशिक), साईकृपा शुगर ॲण्ड इंडस्ट्रीज (नगर), मोहोटादेवी  शुगर ॲण्ड अग्रो लि (पुणे) व समर्थ शुगर ॲग्रो प्रोड. प्रा.लि. (पुणे) या कंपन्यांनी निविदा भरल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

निफाड सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. निविदाही प्रसिद्ध केल्या. त्यास सुरवातीला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर पुन्हा ही निविदा काढण्यात आली. कारखाना भाडेतत्त्वावर सुरू झाल्यास शेतकऱ्यांसह जिल्हा बँकेची आर्थिक घडी बसू शकेल. त्याचबरोबर निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे, अशी अपेक्षा आहे.

कारखाना कोण चालविणार? जिल्हा बँकेने निफाड सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी दुसऱ्यांदा काढलेल्या निविदांना प्रतिसाद मिळाला आहे. राज्यभरातून पाच कंपन्यांनी हा कारखाना चालविण्यास उत्सुकता दाखविली आहे. कारखाना कोणाला चालविण्यास मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबाबत येणाऱ्या मासिक संचालक मंडळ सभेत होणाऱ्या निर्णयाकडे निफाडकरांचे, ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com