वऱ्हाडात १३१७ ई-पॉस मशिनद्वारे खत विक्री

वऱ्हाडात १३१७ ई-पॉस मशिनद्वारे खत विक्री

अकोला ः वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांमध्ये सध्या सुमारे १३१७ मशिन रासायनिक खते विक्री करण्यासाठी कार्यान्वित झाल्या अाहेत. गेल्या अनेक दिवसांपासून जनजागृती केली जात असतानाही अद्याप अनेकांना व्यवहार करताना अडचणी येत अाहेत. सर्वाधिक ७२२ मशिन बुलडाणा तर ३०४ मशिन अकोला अाणि २८८ मशीनवाशीम जिल्ह्यात वाटप झाल्या अाहेत.   रासायनिक खताच्या साठेबाजीवर नियंत्रण मिळवण्यासोबतच शासनाचे अनुदान अाता थेट कंपनीला मिळणार असल्याने ई-पॉस मशीनचा वापर अनिवार्य करण्यात अालेला अाहे. या मशिनच्या वापराबाबत कृषी अधिकाऱ्यांना, खत विक्री करणाऱ्या मालकांना प्रशिक्षण दिले आहे. या मशिनच्या वापरामुळे रासायनिक खतांच्या खरेदीच्या नोंदी आधार कार्डशी संलग्न होणार आहेत. 

समस्या दुर करा ही प्रणाली सुरू करण्यासाठी शासनाने दिलेल्या मशिनचे जिल्हा स्तरावरून वाटप केले गेले. या वाटपासाठी अालेल्या काही मशिन अाधीच बंद होत्या. तर काही मशिनमध्ये वाटपानंतर समस्या तयार झाल्याने विक्रेत्यांनी परत केल्या. या मशिन संबंधित पुरवठादार कंपनीकडे परत पाठविण्यात अाल्या अाहेत. या समस्या लवकर दूर कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.     जिल्हानिहाय दिलेल्या मशीन

बुलडाणा     ७२२
अकोला     ३०४
वाशीम     २८८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com