सोलापूर जिल्ह्यात ऊसदरासाठी शेतकरी संघटना एकत्र

सोलापूर जिल्ह्यातील सर्व कारखानदार एकत्र येऊन शेतकऱ्यांना लुटत आहेत. यंदाच्या हंगामासाठी प्रतिटन सतराशे रुपये ऊसदर देऊन शेतकऱ्यांची लूट करत आहेत.
farmers agitation
farmers agitation

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील सर्व कारखानदार एकत्र येऊन शेतकऱ्यांना लुटत आहेत. यंदाच्या हंगामासाठी प्रतिटन सतराशे रुपये ऊसदर देऊन शेतकऱ्यांची लूट करत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच शेतकरी संघटनांनी एकत्र येत आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. अशा पद्धतीने सर्व शेतकरी संघटना एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ आहे. आता मात्र कारखानदारांना आम्ही वठणीवर आणू, असा निर्धारही संघटनेच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.   सोलापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना, बळीराजा, रयत क्रांती, प्रहार या शेतकरी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुख यांना निवेदन देत ही एकी दाखवून दिली आहे. या सर्व शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली. त्यात ऊसदरावर एकत्र येण्याचा निर्णय झाला. कारखानदार एकत्र येऊन शेतकऱ्यांची लूट करत आहेत. तर आपण एकत्र येऊन त्यांची लूट का थांबवू शकत नाही, हे सूत्र या एकीला कारण ठरले आहे.  सांगली, कोल्हापूरसह उस्मानाबाद जिल्ह्यात यंदाच्या हंगामाला प्रतिटन २५०० रुपयांपेक्षाही अधिक दर देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. पण सोलापुरातील कारखानदार मात्र १७०० रुपये देऊन शेतकऱ्यांची बोळवण करत आहेत, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामूद पटेल, युवा आघाडीचे विजय रणदिवे, रयतक्रांती संघटनेचे दीपक भोसले, बळीराजा संघटनेचे माउली हळणवर, प्रहार संघटनेचे दत्तात्रय मस्के यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.  जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होऊन दोन महिने झाले, पण अद्याप कारखान्यांनी बिले आणि दराबाबत भूमिका घेतली नाही. त्यामुळे या कारखान्यांवर फौजदारी दाखल करावी, तसेच यंदा प्रतिटन २५०० रुपये दर द्यावा, अशी मागणी या संघटनांनी केली आहे. तसेच जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना भेटून यासंबंधी निवेदन दिले. मागण्यांची दखल घ्या अन्यथा आंदोलन तीव्र करू, असा इशारा ‘स्वाभिमानी’चे महामूद पटेल आणि रयतक्रांतीचे दीपक भोसले यांनी सांगितले. युटोपियनसमोर उद्या आंदोलन मंगळवेढ्यातील युटोपियन शुगरने नुकतेच १७०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. कारखानदारांच्या या एकाधिकारशाहीला विरोध म्हणून  गुरुवारी (ता.२६) युटोपियन शुगरच्या गेटसमोर धरणे आंदोलनाचा निर्णयही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे, असे बळीराजा संघटनेचे माउली हळणवर यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com