शेतकरीपुत्राच्या आयुष्यात स्वरांची गुंफण

नाशिक
नाशिक

नामपूर, जि. नाशिक : शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोचली असली तरी शिक्षण व रोजगार यांच्यात मोठी दरी असल्याने बेरोजगारीची समस्या वाढली आहे. रोजगार व नोकरीसाठी होणारी वणवण जीवनात अनेक आवाहन उभे करते. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बुलबुल बँजो निर्मितीच्या छंदातून स्वप्न साकारण्याची किमया मोराणे (ता. बागलाण) येथील हरहुन्नरी संगीतप्रेमी तरुण सचिन मोकासरे याने साधली आहे. पूर्णत: ग्रामीण भागातील पार्श्वभूमी असलेल्या तरुणाने काळाच्या पडद्याआड जाणाऱ्या बुलबुल वाद्याला संजीवनी देऊन संगीतवाद्यांच्या देशाच्या बाजारपेठेत आपला ठसा उमटविला आहे.  नामपूर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मोराणे गावाची लोकसंख्या हजार बाराशेच्या घरात आहे. येथील मोकासरे परिवाराचा शेती हा पारंपरिक व्यवसाय. सचिनचे आजोबा पुंडलिक देशमुख यांना संगीताची आवड होती. त्यांच्याकडे हाताने वाजविता येणारा बुलबुल होता. त्यामुळे सचिनलाही बुलबुल वाद्य वाजविण्याची आवड निर्माण झाली.

गेल्या काही वर्षांपूर्वी सचिन आपल्या मित्रांसोबत कोकणात फिरायला गेला होता. त्या वेळी गुहागर (चिपळूण) येथे त्याला बुलबुल विक्री व दुरुस्ती करणारे दुकान दिसले. येथूनच त्याच्या आयुष्याला टर्निंग पॉइंट मिळाला. ते दुकान राज्यातील नामवंत बुलबुलवादक सुदेश जाधव यांच्या मालकीचे होते. त्यानंतर सचिनने तेथेच सुमारे चार वर्षे बुलबुल वाजविण्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन बुलबुलतरंग निर्मितीचे कौशल्य हस्तगत केले. त्यानंतर धुळे येथेही सुमारे दोन वर्षे काम केल्यानंतर सचिनने आपल्या मूळगावी मोराणे येथील आपल्या शेतात दहा बाय दहाच्या छोटेखानी शेडमध्ये बुलबुल बँजो निर्मितीचा लघुउद्योग उभारून ग्रामीण भागातील तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. जिद्द मेहनत चिकाटी या त्रिसूत्रीच्या जोरावर कोणताही वारसा नसताना एका खेड्यातील शेतकऱ्याच्या लेकाने आकाश व्यापून टाकले आहे. श्री. मोकासरे संपर्क : ७७०९६८३१८४ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com