कांदादर प्रश्नी शेतकऱ्यांचे कळवणला ‘रास्ता रोको’

कांदा
कांदा

कळवण, जि. नाशिक : केंद्र सरकाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतल्याने कांद्याचे भाव कोसळत असल्याचा आरोप करीत शुक्रवारी (ता.२७) कळवण बस स्थानकासमोर सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करून प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. शुक्रवारी (ता.२७) सकाळी सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत केंद्र सरकारचा निषेध केला. चार वर्षांपासून दुष्काळ व सततच्या नापिकीमुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. चालू वर्षी कमी कांदे असून, थोडेफार भाव मिळू लागले होते, मात्र गुरुवारी ३००० ते ३५०० रुपये विकला जाणारा कांदा शासनाच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत व्यापारी वर्गावर दबाव आणून कांदा बाजारभाव पाडण्याचा प्रयत्‍न करण्यात आला. या वेळी कांदा उत्‍पादकांकडून जोरदार टीकाही करण्यात आली. कळवण तालुक्यातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्याची पूर्णतः चाळण झाली असून, तात्काळ खड्डे बुजविण्याचे काम शासनाने हात घेण्याची मागणीही या वेळी करण्यात आली; तसेच महावितरण कंपनीने वसुली थांबवावी, अशी मागणी आंदोलनप्रसंगी करण्यात आली. या वेळी तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनामध्ये शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार, कौतिक पगार, रवींद्र देवरे, धनंजय पवार, राजेंद्र भामरे, महेंद्र हिरे, शैलेश पवार, प्रदीप पगार, टिनू पगार, अमोल पगार, प्रवीण रौंदळ, अमित देवरे, दीपक वाघ, जितेंद्र वाघ, संभाजी पवार, सुनील पगार, विनोद मालपुरे, रत्नाकर गांगुर्डे, संजय रौंदळ, बंडू पगार, ललित आहेर, पप्पू पवार, रामा पाटील, पंकज पाचपिंडे आदी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com