खानदेशात शेतकऱ्यांना पुन्हा पावसाची भीती

जळगाव ः खानदेशात गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. शेतकऱ्यांना पावसाची भीती आहे. कांदा, ज्वारीच्या काढणीची धावपळ सुरू आहे.
Farmers in Khandesh fear rains again
Farmers in Khandesh fear rains again

जळगाव ः खानदेशात गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. शेतकऱ्यांना पावसाची भीती आहे. कांदा, ज्वारीच्या काढणीची धावपळ सुरू आहे. 

सध्या खानदेशात आगाप लागवडीचा कांदा, उशिराचा हरभरा, दादर ज्वारी, संकरित ज्वारी आदी पिके मळणीवर आहेत. ज्वारी मळणी सुरू आहे. कांदा काढणीदेखील सुरू आहे. तसेच नवती केळी बागांची काढणी रावेर, यावल, मुक्ताईनगर, नंदुरबारमधील शहादा, अक्कलकुवा, तळोदा भागात सुरू आहे. उशिराच्या नवती केळीमध्ये निसवणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. केळीचे दर टिकून आहेत. परंतु अशातच ढगाळ वातावरण तयार झाले आहे. 

खानदेशात हिवाळ्यातील चारपैकी तीन महिन्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. आता उन्हाळा सुरू होताच ढगाळ वातावरण तयार झाले आहेत. त्यात काही हवामान अभ्यासक सोशल मीडिया व इतर माध्यमांमध्ये १६ मार्च ते २२ मार्च यादरम्यान काही भागात पाऊस येईल, अशी शक्यता आहे.  या आठवड्यातही ढगाळ वातावरण राहील, असाही अंदाज व्यक्त करीत असल्याने याचा धसका शेतकऱ्यांनी घेतला आहे. 

काढणीवर येत असलेली केळी खरेदीसाठी शेतकरी व्यापाऱ्यांशी संपर्क करीत आहेत. क्विंटलमागे ४० ते ५० रुपये कमी दिले, तरी ते स्वीकारून केळी काढणीचे नियोजन करीत आहेत. 

कारण, बेमोसमी पाऊस, वादळात नुकसान झाल्यास मोठा फटका शेतकऱ्यांना बसेल. कांदा पिकात शेतकरी फवारण्या घेत आहेत. कारण बुरशीजन्य रोग प्रतिकूल वातावरणामुळे शिरण्याची भीती आहे. हरभरा, ज्वारीची मळणी लागलीच करून धान्य लागलीच घरी आणण्याची कार्यवाही शेतकरी उरकून घेत आहेत. 

केळी, मक्याचे सिंचन 

ढगाळ वातावरणामुळे वातावरणात उकाडा आहे. रात्रीदेखील उकाडा जाणवू लागला असून, केळी, मका पिकाचे सिंचन व्यवस्थित करण्यावर शेतकरी भर देत आहेत. मध्येच हलका वारा सुटतो. तसेच काही वेळ वातावरणात दुपारी उकाडा असतो. या प्रतिकूल वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com