फळे, भाजीपाला थेट विक्रीसाठी शेतकऱ्यांनीच घेतला पुढाकार 

माझ्याकडे एक एकरावरील संत्रा विक्रीला आलेला आहे. मात्र बंदमुळे बाजारात नेता येत नाही. त्यात पुर्वमोसमी पावसाचे संकट ओढवले आहे. आता उपलब्ध मोठा संत्रा कसा विकायचा हा प्रश्न आहेच, पण मी नगर शहरात थेट ग्राहकांना पंचवीस ते तीस रुपये प्रती किलोने संत्रा विक्री करत आहे. - चांगदेव शिंदे, शेतकरी, शेंडी, ता. नगर, जि. नगर
फळे, भाजीपाला थेट विक्रीसाठी शेतकऱ्यांनीच घेतला पुढाकार 
फळे, भाजीपाला थेट विक्रीसाठी शेतकऱ्यांनीच घेतला पुढाकार 

नगर : फळे, भाजीपाला विक्रीसाठी नगर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनीच पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांना भाजीपाला, फळे विक्रीसाठी कृषी विभागाने पुढाकार घेऊन परिवहन विभागाकडून साधारण अडीचशे शेतकऱ्यांना वाहतूक परवाने दिले असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. दोन दिवसांत नगर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी जवळपास शंभर टनापेक्षा अधिक भाजीपाला-फळे विकली असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. नगर जिल्ह्यामध्ये सुमारे पावणे सहाशे टन फळे विक्रीसाठी सध्या उपलब्ध आहे.  कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आठ दिवसांपासून राज्यात बंद आहे. त्यामुळे भाजीपाला, फळे विक्रीसाठीच्या अडचणी वाढल्या आहेत. मात्र, नगर जिल्ह्यात विक्रीसाठी शेतकऱ्यांनीच पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यामधील कर्जत, राहाता, राहुरी, नगर, पारनेर, संगमनेर, पाथर्डी, श्रीगोंदा तालुक्यात फळपिकांचे क्षेत्र अधिक आहे. जिल्ह्यात उन्हाळ्यामध्ये कलिंगड, खरबूज, यासह द्राक्ष, मोसंबी, संत्रा पिकाचे उत्पादन हाती येते.  कृषी विभागाने संकलित केलेल्या माहितीनुसार पाचशे टन भाजीपाला व ५८५ टन फळे विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांना भाजीपाला, फळांचे वाहतूक करता यावी यासाठी कृषी विभागाने परिवहन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या मदतीने साधारण अडीचशे परवाने उपलब्ध करून दिले आहेत. शेतकरी छोट्या विक्रेत्यांना, तसेच मोठ्या सोसायटी, अपार्टमेंटमध्ये थेट ग्राहकांना विक्री करत आहेत. नगर संगमनेर, श्रीरामपूरसह मोठ्या शहरात पालिकांच्या मदतीने छोट्या शेतकऱ्यांना भाजीपाला, फळे विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अडचण आल्यास संपर्क करण्याचे आवाहन आत्माचे प्रकल्प उपसंचालक अनिल गवळी यांनी केले आहे.    विक्रीसाठी उपलब्ध असलेली फळे (टनात)  द्राक्ष ः ३९०, डाळिंब ः ५, चिकू ः ३, पेरू ः १४, खरबूज ः २२, कलिंगड ः १४०, लिंबू ः १५. कांदा ः २१०  प्रतिक्रिया मी शेतकऱ्यांकडून खरेदी करून पुणे शहरातील सोसायट्यांत भाजीपाला, फळांची विक्री करतो. दर दिवसाला सुमारे पंचवीस टन मालाची विक्री करतो. सध्या बंद असला तरी भाजीपाला विक्रीला काही अडचण नाही. नगर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांकडून जागेवर खरेदी करून बाजारातील दर देतो. सध्याच्या परिस्थितीत थेट ग्राहकांना विक्री केली जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत नाही.  - जावेद शेख, भाजीपाला, फळे विक्रेता, आंतरवली ता. जामखेड, जि. नगर 

नगरसह जिल्हाभरात फळे विकण्यासाठी कृषी विभाग आवश्यक ते प्रयत्न आणि मदत करत आहे. शेतकरी ते ग्राहक हा समन्वय या बंदच्या काळात केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून कृषी विभागाने घेतलेल्या पुढाकारामुळे नगर बाजार समिती पुन्हा एकदा चालू झाली आहे. येथे बऱ्यापैकी आज फळे विक्रीला आली. शेतकऱ्याचे नुकसान टाळण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे.  - शिवाजीराव जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नगर 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com