भंडारा : शेतकरी किसान सन्मानच्या लाभापासून वंचित

भंडारा जिल्ह्यातील शेतकरी किसान सन्मानच्या लाभापासून वंचित
भंडारा जिल्ह्यातील शेतकरी किसान सन्मानच्या लाभापासून वंचित

भंडारा ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेला वर्षभराचा कालावधी लोटला. परंतु अद्यापही भंडारा तालुक्‍यातील खमाटा (टाकळी) येथील शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. त्यांना त्वरित योजनेचा लाभा देण्यात यावा, अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीने केली आहे.  सहायक निबंधकांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या विषयावर निवेदन पाठविण्यात आले. निवेदनानुसार, पंतप्रधान किसान सन्मान निध योजनेची रक्‍कम अद्यापपर्यंत बॅंक खात्यात जमा न झाल्यामुळे खमाटा येथील शेतकऱ्यांना तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे समाधान न करताच उडवाउडवीची उत्तरे देत त्यांना गावी पाठविले जाते. त्यावरूनच तहसील कार्यालयाचे अधिकारीच योजनेच्या अंमलबजावणी संदर्भाने उदासीन असल्याचा आरोप शेतकरी संघर्ष समितीने केला आहे. योजनेपासून वंचित शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ देण्यात यावा, ऑनलाइन प्रक्रियेत काही त्रुटी असल्यास त्यातील दुरुस्तीकरिता खमाटा येथे शिबीर लावण्यात यावे अशी देखील मागणी आहे. खमाटा ते भंडारा हे अंतर १२ किलोमीटर असून शेतकऱ्यांना तहसीलमध्ये येजा करणे परवडत नाही. यादीमध्ये घोळ करणाऱ्या व हेतुपुरस्सर शेतकऱ्यांना मानसिक, आर्थिक त्रास देऊन योजनेपासून वंचित ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीदेखील समितीची आहे. काही शेतकऱ्यांचा समावेश अद्यापही योजनेत केलेला नाही. त्यांच्या नावाची नोंदणी करावी, असेही समितीचे म्हणणे आहे. निवेदनकर्त्यांमध्ये जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे, पुरुषोत्तम गायधने, विनोद भोपे, देवराव भोपे, भाऊराव नेरकर, अशोक पवनकर, बाबूराव चौधरी, ग्यानीराम ढेंगे, विकास निंबार्ते यांचा समावेश होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com