शेतकऱ्याने तुटपुंज्या मदतीचा धनादेश केला परत

५ हजार रुपयांचा धनादेश नुकसान भरपाईपोटी मिळाला. ही तुटपुंजी रक्कम मिळाल्याचे सांगून श्री. देशमुख यांनी शासनाचा निषेध केला. तसेच मिळालेला धनादेश येवल्याचे तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्याकडे परत केला आहे.
The farmer returned the meager aid check
The farmer returned the meager aid check

नाशिक : निसर्ग चक्री वादळाने ३ जून रोजी येवला तालुक्यातील अंदरसुल येथील शेतकरी गजानन देशमुख यांचे पोल्ट्री फार्मचे मोठे नुकसान झाले होते. ज्यामध्ये २५०० ब्रॉयलर कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. तर संपूर्ण शेड जमीनदोस्त झाले. या घटनेची पाहणी दुसऱ्या दिवशी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी करत भरीव मदत करण्याचे यावेळी जाहीर केले. मात्र, त्यांच्याच हस्ते शनिवार (ता. ११) ५ हजार रुपयांचा धनादेश नुकसान भरपाईपोटी मिळाला.ही तुटपुंजी रक्कम मिळाल्याचे सांगून श्री. देशमुख यांनी शासनाचा निषेध केला.तसेच मिळालेला धनादेश येवल्याचे तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्याकडे परत केला आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळे हे नुकसान झाल्यानंतर पालकमंत्री श्री. भुजबळ तसेच दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. भारती पवार येऊन या नुकसानीपोटी भरीव मदत देण्याचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात मात्र ही मदत तुटपुंजी मिळाली. शासनाने फक्त ५ हजारांचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते देऊन माझी चेष्टा केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

कुक्कुटपालन व्यवसायासाठी घेतलेले बँकेचे कर्ज त्यातुलनेत झालेले नुकसान पाहिल्यास मोठी तफावत आहे. मात्र, पालकमंत्री भुजबळ यांनी भेट दिल्यानंतर मला रास्त मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु या रकमेतून काहीच होणार नसल्याने शासनाने केलेल्या २१ लाखांच्या पंचनाम्याच्या तुलनेत रास्त मदत घ्यावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे.

नुकसान लाखात अन् मदत हजारात महसूल यंत्रणेने २१ लाख ३१ हजार ५०० रुपयांचा पंचनामा केला. मात्र, पालकमंत्री भुजबळ यांच्या उपस्थितीत केवळ पाच हजार रुपयांचा धनादेश दिला. ‘नुकसान झाले लाखात अन् शासनाची मदत हजारात’ असा अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केल्याचे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com