निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा लागवडीवर परिणाम

खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील कांदा लागवड निम्म्याने कमी झाली आहे. यातच महागडे बियाणे व कांदा निर्यातीमधील अडथळे यामुळे आगामी रब्बी हंगामातील (उन्हाळ कांदा) लागवडदेखील कमी होईल, असे चित्र आहे.
Export barriers, seed rates affect onion cultivation
Export barriers, seed rates affect onion cultivation

जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील कांदा लागवड निम्म्याने कमी झाली आहे. यातच महागडे बियाणे व कांदा निर्यातीमधील अडथळे यामुळे आगामी रब्बी हंगामातील (उन्हाळ कांदा) लागवडदेखील कमी होईल, असे चित्र आहे.

खरिपातील कांद्याची काढणी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये होईल. लागलीच नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये कांद्याची लागवड सुरू होते. उन्हाळ्यात त्याची काढणी सुरू होते. अर्थातच उन्हाळ कांद्याच्या उत्पादनावर पुढे परिणाम होऊ शकतो. कारण सध्या कांदा पिकाबाबत सकारात्मक चित्र नाही. खरिपातील कांद्याची लागवड अपवाद वगळता आटोपली आहे. ही लागवड अतिपाऊस, अतिउष्णता यामुळे कांदा रोपवाटिकांमध्ये रोपांचे नुकसान झाल्याने निम्म्याने कमी झाली आहे. या कांद्यास पुढे चांगले दर मिळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. कारण लागवड घटली आहे. ही लागवड सुमारे सात ते साडेसात हजार हेक्टर एवढीच खानदेशात झाल्याचे सांगितले जात आहे.

आता अनेक शेतकरी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये कांदा लागवडीसाठी बियाण्याची चाचपणी, बाजारपेठेचा आढावा घेत होते. यातच शासनाने कांद्यावर निर्यातबंदी लादली. तसेच सध्या कांदा बियाणे अतिशय महाग आहे. अनेक वर्षांमधील चढे दर कांदा बियाण्याला बाजारात आहे. शेतकऱ्यांकडून गेल्या उन्हाळ्यात किंवा मे, जून महिन्यात कवडीमोल दरात या बियाण्याची खरेदी काही खरेदीदार, कंपन्यांनी केली होती. या बियाण्याला सध्या ३५०० ते ४००० रुपये प्रतिकिलोचा दर बाजारात आहे.

कांद्याची लागवड खरिपात कमी झाली. पुढे रब्बीमध्येही लागवड कमी होईल. कारण बियाणे एवढे महाग आहे, की त्यातच मोठी गुंतवणूक करावी लागेल. शिवाय बियाण्याच्या उगवणशक्ती बाबत कुणीही हमी घेत नाही. - पंकज महाजन, शेतकरी, चोपडा, जि. जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com