कोल्हापुरात महावितरणची वीजबिल भरणा केंद्रे सुरू

कोल्हापूर : गेली दोन महिने लॉकडाऊनमुळे बंद असलेली जिल्ह्यातील महावितरणची वीजबिल भरणा केंद्रे सुरक्षित अंतराचे नियम पाळून आता पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहेत. वीज ग्राहकांनी नजीकच्या अधिकृत वीजबिल भरणा केंद्रावर आपले वीजबिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे प्रभारी मुख्य अभियंता अंकुर कावळे यांनी केले आहे.
electricity bill payment center opened in Kolhapur
electricity bill payment center opened in Kolhapur

कोल्हापूर : गेली दोन महिने लॉकडाऊनमुळे बंद असलेली जिल्ह्यातील महावितरणची वीजबिल भरणा केंद्रे सुरक्षित अंतराचे नियम पाळून आता पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहेत. वीज ग्राहकांनी नजीकच्या अधिकृत वीजबिल भरणा केंद्रावर आपले वीजबिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे प्रभारी मुख्य अभियंता अंकुर कावळे यांनी केले आहे.

सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणनेही वीजबिल भरणा केंद्रे बंद ठेवली होती. चौथ्या टप्प्यांत लॉकडाऊन शिथिल झाल्यावर केंद्र शासन, महाराष्ट्र शासन व स्थानिक प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून महावितरणने वीजबिल भरणा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा बँक लॉकडाऊन काळातही चालू असल्यामुळे त्यांच्या १९७ शाखांमधील बिल भरणा सुरूच होता.

उर्वरित सहकारी बँका, पतसंस्था, कार्यालयीन भरणा इत्यादी मिळून २३८ भरणा केंद्रे लॉकडाऊन काळात बंद होती. ही २३८ वीजबिल भरणा केंद्रे टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यात आली आहेत.लॉकडाऊन काळात वीजबिलाची छपाई व वितरण बंद ठेवून सरासरी वापराने बिल आकारणी करण्यात आली होती. परिणामी ग्राहकांकडे छापील बिले नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेल्या वीजबिलाच्या संदेश, ईमेल अथवा संकेतस्थळावरुन डाऊनडोड केलेले पीडीएफ स्वरुपातील बिल दाखवून भरणा करावा.

अगदी जुन्या वीजबिलावरील ग्राहकक्रमांकाधारे सुद्धा वीजबिल भरुन घेतले जाईल. भरणा केंद्रांवर ग्राहकांनी सुरक्षित अंतराचे नियम पाळावेत. मास्क वापरावा. तसेच वीजबिलाचे नेमके पैसे द्यावेत. दोन महिने वीजबिल भरणा बंद असल्याने महावितरणची आर्थिक घडी विस्कटली आहे. महसूल कमालीचा घटला असून या आर्थिक अरिष्टातून सावरण्यासाठी वीज ग्राहकांनी आपल्या नजीकच्या केंद्रावर किंवा महावितरण मोबाईल ॲपच्या आधारे वीजबिलाचा भरणा करावा, असे आवाहन प्रभारी मुख्य अभियंता श्री. कावळे यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com