दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणी

परभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न दुधना धरणात पाणलोट क्षेत्रातून आवक वाढल्यामुळे सोमवारी (ता.२२) धरणाच्या १४ दरवाजाव्दारे २५ हजारांवर क्युसेक्सने विसर्ग सुरु केला.
Dudhna river floods, water in crops
Dudhna river floods, water in crops

परभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न दुधना धरणात पाणलोट क्षेत्रातून आवक वाढल्यामुळे सोमवारी (ता.२२) धरणाच्या १४ दरवाजाव्दारे २५ हजारांवर क्युसेक्सने विसर्ग सुरु केला. त्यामुळे नदीला आलेल्या महापूराचे पाणी शेतात शिरले. परिणामी, सेलू, मानवत, जिंतूर, परभणी तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले.

पाण्याची आवक कमी झाल्यामुळे १२ दरवाजे बंद करुन मंगळवारी (ता.२२) दुपारी दोन दरवाजांव्दारे ३ हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरु होता, असे सूत्रांनी सांगितले. जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे.

विसर्ग सोडल्याने केदार वाकडी, मोरेगाव, खुपसा, ब्राम्हणगाव, राजवाडी, वलंगवाडी, डुगरा, सोन्ना, खादगाव,  टाकळी निलवर्ण, मंगरुळ, सावंगी मगर, इरळद,कोथाळा,राजुरा, शेवडी, वडगाव ईक्कर, दुधनगाव, काष्टगाव, पिंपळगाव गायके,कुंभारी , कुंभारी बाजार, जवळा, मांडवा गावांत शेतामध्ये पाणी शिरले. त्यामुळे पिके पाण्याखाली गेली. शेतकऱ्यांनी भरपाईची मागणी केली.

पुराच्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग खूप होता. त्यामुळे नदी काठच्या शेतातील जमिनी खरडून गेल्या. त्यामुळे सोयाबीन, कपाशी, तसेच अन्य पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले. पंचनामे करुन तत्काळ नुकसान भरपाई द्यावी. - ज्ञानेश्वर सिध्दनाथ, शेतकरी, कोथाळा, ता. मानवत, जि. परभणी

पुराच्या पाण्यामुळे फळबागा, पिके पाण्याखाली गेल्यामुळे मोठी हानी झाली. आता भरपाई द्यावी. - प्रभारकर चव्हाळ, मोरेगाव, ता. सेलू, जि. परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com