राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज 

राज्यात गेल्या आठवडाभरापासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली आहे. ढगाळ हवामानामुळे थंडी कमी झाली आहे. आजपासून (ता. २५) राज्याच्या अनेक भागांत मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
Dry weather forecast in the state
Dry weather forecast in the state

पुणे : राज्यात गेल्या आठवडाभरापासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली आहे. ढगाळ हवामानामुळे थंडी कमी झाली आहे. आजपासून (ता. २५) राज्याच्या अनेक भागांत मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.  मंगळवारी (ता. २३) राज्याचा अनेक भागांत अंशत: ढगाळ हवामान होते. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावासाने हजेरी लावली आहे. बुधवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोल्हापुरातील चंदगड येथे ३० मिलिमीटर, सोलापूरमधील मोहोळ आणि लातूर निलंगा येथे प्रत्येकी १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.  पावसाने उघडीप देताच राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी तापमान ३२ अंशांच्या पुढे गेले आहे. दुपारी उन्हाचा चटका आणि उकाड्यातही वाढ झाली आहे. बुधवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये परभणी आणि यवतमाळ येथे उच्चांकी ३५.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. बहुतांशी ठिकाणी किमान तापमानाचा पारा २० अंशांच्या पुढेच असून, निफाड येथे नीचांकी १८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

बुधवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३३.७ (२१.२), नगर -(२२.२), जळगाव ३४.२ (२१), कोल्हापूर ३१.७ (२२.२), महाबळेश्‍वर २४.७ (१८.४), मालेगाव ३०.४ (२४), नाशिक ३२.४ (२१.५), निफाड ३० (१८.२), सांगली ३१.३ (२२.२), सातारा २८.६(२३.३), सोलापूर ३४.२ (२०.५), सांताक्रूझ ३३.२ (२६.२), अलिबाग ३०.८ (२५.४), डहाणू ३२.२ (२६.३), रत्नागिरी ३२.९ (२५.१), औरंगाबाद ३४ (२१.८), नांदेड - (२३), उस्मानाबाद - (२१.२), परभणी ३४.८ (२२.७), अकोला ३४ (२२.६), अमरावती ३२ (१९.१), ब्रह्मपुरी ३४.८ (२०.८), बुलडाणा ३२ (२०.९), चंद्रपूर ३१.४ (२१.६), गडचिरोली ३२ (२०.८), गोंदिया ३० (१९.६), नागपूर ३२ (१९.६), वर्धा ३२.६ (२१), वाशीम ३३.५ (१९), यवतमाळ ३५.५ (२०). 

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे संकेत  बंगालच्या उपसागरामध्ये असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे या भागात आज (ता. २५) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली तमिळनाडू आणि श्रीलंकेच्या किनाऱ्याकडे सरकण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com