जमिनीतील ऑक्सिजन, पाणी स्थिती सांगण्यासाठी सेन्सर तंत्रज्ञान उपयुक्त : डॉ. डेव्हिड मिर्झाही

जमिनीतील ऑक्सिजन, पाणी स्थिती सांगण्यासाठी सेन्सर तंत्रज्ञान उपयुक्त : डॉ. डेव्हिड मिर्झाही
जमिनीतील ऑक्सिजन, पाणी स्थिती सांगण्यासाठी सेन्सर तंत्रज्ञान उपयुक्त : डॉ. डेव्हिड मिर्झाही

पुणे : झाडाच्या चांगल्या वाढीसाठी मुळांच्या जवळ पुरेसा ऑक्सिजन असणे आवश्यक आहे. पाणी जास्त झाले, तर मुळांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे मुळांची वाढ होत नाही व पुरेशा प्रमाणात अन्नद्रव्ये शोषणक्रिया होत नाही. हे मुद्दे विचारात घेऊन पल्स इरिगेशन तंत्रज्ञान विकसित केले असल्याचा दावा इस्राईल येथील ऑटोनोग्राम कंपनीचे डॉ. डेव्हिड मिर्जाही यांनी केला.  महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या द्राक्ष परिसंवादामध्ये शनिवारी (ता. ३) दुपारच्या सत्रात ‘चोपण जमिनीतील द्राक्षबागांसाठी सेन्सरच्या साह्याने पाणीव्यवस्थापन’ या विषयावर ते बोलत होते.  या तंत्रज्ञानामध्ये वापरला जाणारा हा सेन्सर मुळाजवळील क्षारता, सामू आणि नायट्रेट (No 3) मोजतो. तसेच, ऑक्सिजनचे प्रमाणही यावरून कळते. हा सेन्सर जमिनीतील पाण्याची परिस्थिती आणि हवेतील तापमानानुसार स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणाली कार्यान्वित ठेवतो. त्यामुळे मुळाच्या परिसरातील स्थिती योग्य राहून मुळांची चांगली वाढ होते. क्षार जमिनीवर येत नाही. वापसा परिस्थिती कायम राहते. अन्नद्रव्ये चांगल्या प्रमाणात शोषली जातात. या तंत्रज्ञानामुळे ठिबक सिचनामध्ये ३० टक्के पाणी व ६० टक्के अन्नद्रव्यांची बचत होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. १५ टक्के उत्पादन व गुणवत्तावाढ, ५० टक्के पाणीबचत, ताणाच्या काळातदेखील तंत्रज्ञान उपयुक्त असल्याने दुष्काळी परिस्थितीत फायदेशीर ठरणार असल्याचा दावा त्यांनी केला. यामध्ये संगणक प्रणालीच्या माध्यमातून पाणी व विद्राव्य खतपुरवठा नियंत्रित केला जातो.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com