Disinfection device available by the Swadhyaya family
Disinfection device available by the Swadhyaya family

स्वाध्याय परिवारातर्फे निर्जंतुकीकरण यंत्र उपलब्ध

मुंबई : सध्या ‘कोरोना’च्या संकटाचा संपूर्ण भारत सर्वशक्तीनिशी एकजुटीने प्रतिकार करीत असतानाच काही स्वयंसेवी संस्था आणि संप्रदाय करीत असलेली मदत लाखमोलाची ठरत आहे. स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक पांडुरंगशास्त्री आठवले आणि त्यांची कन्या सौ. धनश्री तळवलकर यांनी याच भावनेतून राज्य सरकारला निर्जंतुकीकरण करणारी विशेष फॉगिंग मशीन्स उपलब्ध करून दिली आहेत. परिवाराकडून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला एक यंत्र देण्यात आले आहे.

महामारीच्या वेळी अशा उपायांबरोबरच अनेक देशांमध्ये फॉगिंग मशीन्सद्वारे विशेष जंतुनाशकांची फवारणी करून अनेक हमरस्ते तसेच अनेक वस्त्यांचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. स्वाध्याय परिवारातर्फे अशा प्रकारची विशेष ५ फॉगिंग मशीन्स महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाला देण्यात आली. 

भायखळा येथील अग्निशमन दलाच्या मुख्यालयात हे मशीन देण्यात आली. ज्यांचा वापर मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरात निर्जंतुकीकरणासाठी करण्यात येणार आहे.याआधी वैद्यकीय क्षेत्रात जिवावर उदार होऊन सेवा बजावणाऱ्या व्यक्तींसाठी मास्क आरोग्य विभागाला दिले आहेत. 

तसेच मुंबईप्रमाणे महाराष्ट्रात नाशिक, नगर व नांदेड येथे पण अशा प्रकारची फॉगिंग मशीन्स स्वाध्याय परिवाराकडून देण्यात येणार आहेत. तर गुजरात मधील अहमदाबाद, बडोदा, राजकोट, भावनगर, सुरेंद्रनगर, भुज या शहरात अशी अनेक मशीन्स यापूर्वीच दिली गेली आहेत. त्याबरोबरच मास्क, हँडग्लोव्हस तसेच सॅनिटायझर असे एकत्र असणारे ३० हजार किट्स आजपर्यंत परिवाराने दिलेले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com