अनुदानावरील पशुखाद्य पुरवठ्यासाठी उद्या मंथन

पोल्ट्री
पोल्ट्री

नागपूर ः पशुखाद्याच्या तुटवड्यामुळे अडचणीत आलेल्या पोल्ट्री उद्योगाला दिलासा देण्याकरिता उद्या (ता. २४) दुपारी तीन वाजता पशुसंवर्धन खात्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. अनुदानावर धान्य उपलब्धतेसंदर्भात या बैठकीत पोल्ट्री व्यवसायिकांशी चर्चा केली जाणार आहे.  राज्यात मक्‍यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे, त्यामुळे पोल्ट्री उद्योगासह डेअरी उद्योगही अडचणीत आला असून, उत्पादकता खर्चात वाढ झाली आहे. परिणामी अंड्यांचा प्रतिनग उत्पादन खर्च ४ रुपये, तर विक्री प्रतिनग ३ रुपये १५ पैशाने होत आहे. देशभरात सध्या अशीच स्थिती असल्याने पोल्ट्री उद्योग संक्रमणावस्थेतून जात आहे.  दिल्लीत जंतरमंतरवर याच मुद्द्यावर आंदोलनही करण्यात आले; परंतु त्यानंतरही स्थितीत सुधारणा होत नसल्याने अन्न व नागरी पुरवठा खात्यांतर्गत असलेले धान्य अनुदानावर देण्याची मागणी व्यवसायिक करीत आहेत. या संदर्भाने वारंवार पाठपुरावा करण्यात आला. नॅशनल एग को-आॅर्डिनेशन कमिटीचे राज्य अध्यक्ष शाम भगत यांनीदेखील प्रयत्न चालविले आहेत. त्याची दखल घेत मंगळवारी (ता. २४) दुपारी तीन वाजता पशुसंवर्धन खात्याच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेत बैठक होणार आहे. प्रत्येक विभागातून एक कुक्‍कुटखाद्य निर्मिती व्यवसायिक व विभागातील प्रत्येक जिल्ह्यातून एक प्रगत कुक्‍कुट व्यावसायिक यांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com