बुलडाणा जिल्हा संपन्न करण्यासाठी कटिबद्ध : पालकमंत्री डॉ. शिंगणे

बुलडाणा जिल्हा संपन्न करण्यासाठी कटिबद्ध ः डॉ. राजेंद्र शिंगणे
बुलडाणा जिल्हा संपन्न करण्यासाठी कटिबद्ध ः डॉ. राजेंद्र शिंगणे

बुलडाणा  ः ‘‘जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाचा निधी खेचून आणत खर्ची घालण्यात येणार आहे. जिल्हा हा राज्यामध्ये सर्वच क्षेत्रांत अग्रेसर राहावा, यासाठी प्रयत्न करू. जिल्ह्याला सर्वतोपरी संपन्न जिल्हा करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे,’’ असा विश्‍वास जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केला. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात ते बोलत होते.  डॉ. शिंगणे म्हणाले, ‘शासनाने एक एप्रिल २०१५ पासून ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत व्याजासह मुद्दल असलेले दोन लाख रुपये पीककर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून जिल्ह्यात दोन लाख ९४० लाभार्थी शेतकऱ्यांना १४० कोटी ७४ लाख रुपये लाभ होणार आहे.’  ‘जिल्ह्यात रोजगार हमी योजनेमधून आत्तापर्यंत ६२ हजार २०० व्यक्तींना रोजगार देण्यात आला आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात रोहयो अंतर्गत १३१२ कामे सुरू असून, त्यावर सहा हजार ८४५ मजुरांची उपस्थिती आहे. मातृतीर्थ सिंदखेडजा येथील ऐतिहासिक स्थळांचा विकास करण्यासाठी राज्य शासन सिंदखेड राजा विकास आराखडा राबवित आहे. तसेच लोणार पर्यटन विकास आराखडाही राबविण्यात येत आहे.  जिल्ह्यात बोरखेडी, दुर्गबोरी, निम्न ज्ञानगंगा, दिग्रस लघुप्रकल्प पूर्ण करण्यात आले असून तीन हजार ५४२ हेक्टर सिंचन निर्माण झाले आहे’, असा दावा डॉ. शिंगणे यांनी केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com