गेल्या हंगामातील थकीत पीककर्जाच्या पुनर्गठनासाठी मुदतवाढ

गेल्या हंगामातील थकीत पीककर्जाच्या पुनर्गठनासाठी मुदतवाढ
गेल्या हंगामातील थकीत पीककर्जाच्या पुनर्गठनासाठी मुदतवाढ

अकोला ः सन २०१८ च्या खरीप हंगामात दुष्काळ जाहीर झालेल्या तालुका व महसूल मंडळांमध्ये पीककर्जाचे पुनर्गठन करण्यास सोमवार (ता. ३०) सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सोबतच शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीलाही स्थगिती देण्यात आली आहे. याबाबत जिल्हा उपनिबंधकांनी बॅंकांना तसे पत्र देत उचित कार्यवाही करण्याबाबत सुचविले आहे.

गेल्या हंगामात पीककर्ज घेतलेल्या व भरणा करू न शकलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा मिळणार आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने पीककर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरवातीला ३१ जुलैपर्यंत ही मुदतवाढ होती. या मुदतीत अनेक शेतकरी पीककर्ज पुनर्गठनापासून वंचित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बॅंकर्स समितीच्या पत्रानुसार भारतीय रिझर्व्ह बॅंकेने पुनर्गठनाची कार्यवाही करण्यासाठी आता ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. 

या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी मंगळवारी (ता. तीन) जिल्हा अग्रणी बॅंक तसेच जिल्हा बॅंकेला पत्र देऊन उचित कार्यवाही करण्याचे सूचविले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या हंगामात २५ हजारांवर शेतकऱ्यांनी पीककर्ज घेतले. परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे ते परत करू शकले नव्हते. शिवाय ते पुनर्गठनापासून दूर होते. अशांना या उपरोक्त निर्णयाचा आता लाभ मिळू शकेल. मुदतवाढ मिळाल्याने कर्जाचे पुनर्गठन करण्याची संधी मिळाली आहे. 

मागील वर्षापर्यंत थकीत असलेले व नव्याने पीककर्ज न मिळालेल्या थकबाकीदारांच्या पीककर्जाचे पुनर्गठन मात्र होणार नाही. त्यांना नवीन पीककर्जसुद्धा मिळू शकणार नाही, असेही सांगितले जात आहे. गेल्या हंगामात नव्याने पीककर्ज घेतलेल्यांना व परतफेड करू न शकलेल्यानाच पुनर्गठनाचा लाभ मिळू शकेल. ते नवीन पीककर्जासाठी पात्र ठरतील, अशी माहिती समोर आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com