अमरावतीत एक लाख हेक्‍टरवरील पिकांना फटका

सप्टेंबरमधील संततधार पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. महसूल विभागाच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील तब्बल १ लाख ९८ हजार ८१२ हेक्‍टर क्षेत्रातील पिके उद्‌ध्वस्त झाली असून ४२ हजार ८५० हेक्‍टर क्षेत्र खरडून गेले आहे.
Crops on one lakh hectares hit in Amravati
Crops on one lakh hectares hit in Amravati

अमरावती ः सप्टेंबरमधील संततधार पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. महसूल विभागाच्या अहवालानुसार,  जिल्ह्यातील तब्बल १ लाख ९८ हजार ८१२ हेक्‍टर क्षेत्रातील पिके उद्‌ध्वस्त झाली असून ४२ हजार ८५० हेक्‍टर क्षेत्र खरडून गेले आहे.

जिल्ह्यात ६ लाख ८० हजार ७४० हेक्‍टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली असल्याचा कृषी विभागाचा अंतिम अहवाल आहे. यामध्ये मूग १५,९२९, उडीद ४९३३, कापूस २ लाख ४४ हजार, सोयाबीन २ लाख ६९ हजार ६५९ व तूर १ लाख ६ हजार १३५ हेक्‍टर क्षेत्रात पेरण्यात आली आहे.

सोयाबीन पिकाच्या उगवणीपासूनच तक्रारी होत्या. त्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबरमधील पावसाने त्यावर संकट आणले. या दोन महिन्यातील संततधार पावसाने सर्वच पिकांची अतोनात हानी केली. मूग, उडीद तर हातातून गेलेच, मात्र नंतर सोयाबीनवरही विपरीत परिणाम झाला. १ जून ते १८ सप्टेंबरपर्यंत झालेल्या नुकसानीचा अंदाज महसूल विभागाने काढला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १ लाख ९८ हजार ८१२ हेक्‍टर क्षेत्रातील पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे.

यामध्ये सर्वाधिक नुकसान मूग, उडीद व सोयाबीनचे झाले. मूग व उडीद हातून गेल्याची स्थिती आहे, तर सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटले आहेत. कापसालाही पावसाचा मोठा फटका बसल्याचे अहवालात आहे. पावसामुळे सर्वाधिक नुकसान अमरावती तालुक्‍यात झाल्याचे अहवालात नोंद आहे. या तालुक्‍यातील ३१ हजार ९४३ हेक्‍टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून त्या खालोखाल वरुड २९,९७०, धामणगाव रेल्वेतील २८,०३४, चांदूररेल्वेतील २०,६७९ व मोर्शी तालुक्‍यातील १९ हजार २७७ हेक्‍टर पीक उद्‌ध्वस्त झाले आहे.काही भागांतील शेतजमीनच खरडून गेल्याने पिकांसह जमिनीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ४२ हजार ८५० हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com