राज्यात कोरोना उपचारासाठी ३० विशेष रुग्णालये घोषित ः टोपे

मुंबई : ‘‘‘कोरोना’ला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषित केली आहेत. या रुग्णालयांत केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील.
For corona treatment in the state ३० Special Hospitals Announced : Tope
For corona treatment in the state ३० Special Hospitals Announced : Tope

मुंबई : ‘‘‘कोरोना’ला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषित केली आहेत. या रुग्णालयांत केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील. त्यासाठी अधिसूचना काढण्यात आली आहे. २३०५ खाटा ‘कोरोना’बाधितांच्या उपचारासाठी उपलब्ध झाल्या आहेत’’, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी (ता.२) दिली. 

या अधिसूचनेमुळे या रुग्णालयांना संशयित आणि ‘कोरोना’चे निदान झालेल्या रुग्णांना केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करणे बंधनकारक असेल. राज्य शासनातर्फे कोरोना प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. राज्यात चाचण्यांची सुविधा वाढवितानाच आवश्यकता भासल्यास रुग्णांवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष करण्यात आले आहेत. मात्र, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यावरील उपचारासाठी विशेष रुग्णालये घोषित करण्यात आली आहेत. त्यासाठी आरोग्य संचालकांनी अधिसूचना काढली आहे, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. एकूण २३०५ खाटा कोरोना बाधीत रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहेत.  जिल्हा आणि त्यातील अधिसूचित रुग्णालयांची नावे (कंसात खाटांची संख्या) 

ठाणे- जिल्हा रुग्णालय, टी. बी बिल्डिंग (१००), मीरा भाईंदर- पंडीत भीमसेन जोशी रुग्णालय (१००), वाशी- सामान्य रुग्णालय (१२०), कल्याण डोबिवली महापालिका- शास्त्री नगर दवाखाना (१००), रायगड- पनवेल उपजिल्हा रुग्णालय (१००), नाशिक- कुंभमेळा बिल्डिंग व महानगरपालिका कठडा हॉस्पीटल अनुक्रमे (१००) (७०), नगर- जिल्हा रुग्णालय (१००), नंदूरबार- डोळ्यांचा दवाखाना (५०), धुळे- जिल्हा रुग्णालयाची शहारातील इमारत (५०), पुणे- जिल्हा रुग्णालय, औंध (५०), सातारा- सामान्य रुग्णालय (६०), सिंधुदूर्ग- नविन इमारत एएमपी फंडेड (७५), रत्नागिरी-सामान्य रुग्णालय व कळंबोळी उपजिल्हा रुग्णालय अनुक्रमे (१००) (५०).  मराठवाड्यातील रूग्णालये 

औरंगाबाद- जिल्हा रुग्णालय (१००), हिंगोली- जिल्हा रुग्णालय (१००), हिंगोली- कळमनुरी उपजिल्हा रुग्णालय (५०), लातूर- उदगीर उपजिल्हा रुग्णालय (५०), उस्मानाबाद- जिल्हा रुग्णालय, नविन इमारत (१००), उमरगा उपजिल्हा रुग्णालय टीसीयू बिल्डींग (५०) आणि तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय नविन इमारत (५०), नांदेड- जिल्हा रुग्णालय जुने (५०) आणि मुखेड उपजिल्हा रुग्णालय (५०).  विदर्भातील रूग्णालये 

अमरावती- विशेषोपचार रुग्णालय नविन इमारत (१००), वाशीम- जिल्हा रुग्णालय, डीईआयसी इमारत (५०), बुलढाणा-स्त्री रुग्णालय नविन इमारत (१००), वर्धा- सामान्य रुग्णालय (५०), भंडारा- सामान्य रुग्णालय एएमसीएच विंग नविन इमारत (८०) आणि गडचिरोली- जिल्हा रुग्णालय (१००)   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com