वर्धा जिल्ह्यात गावस्तरावर आता कोरोना निगराणी पथक 

वर्धा ः नागपूर, अमरावती, यवतमाळ या कोरोनाबाधित जिल्ह्यातून आडमार्गाने येणाऱ्या नागरिकांवर नजर ठेवण्यासाठी गावस्तरिय कोरोना निगराणी पथक स्थापन करण्यात आले आहे. सरपंचांच्या अध्यक्षतेखाली हे पथक काम करेल. या पथकामार्फत इतर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना अटकाव केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिली.
Corona monitoring team now at village level in Wardha district

आजपर्यंत नागरिकांच्या सहकार्याने वर्धा जिल्ह्याला कोरोनामुक्‍त ठेवण्यात प्रशासनाला यश मिळाले. आजूबाजूच्या तीन जिल्ह्यांत कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. नागपूर, यवतमाळ आणि अमरावती हे तीन जिल्हे रेडझोनमध्ये आले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्‍त वर्धा जिल्ह्यात आता गावसिमाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

जिल्ह्यात चोरमार्गाने प्रवेश करणाऱ्यांची संख्या रोज १५० ते २०० अशी आहे. आजवर १८ हजार ५०९ नागरिक इतर जिल्ह्यातून वर्धामध्ये आले आहेत. अशाप्रकारे इतर जिल्ह्यातून नागरिक आल्यास कोरोनाबाधित होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे गावस्तरावर कोरोना निगराणी पथक स्थापन करण्यात येणार आहे. या संदर्भात माहितीकरिता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी झूम मीटव्दारे सरपंचाशी संवाद साधला. 

असे आहे पथक  सरपंच या पथकाचे अध्यक्ष राहतील. तर गावातील दहा ते १५ व्यक्‍ती त्यात प्रामुख्याने युवकांचा समावेश राहणार आहे. गावचे रस्ते वाहतूकीस बंद करतील, गावात अवैध मार्गाने येणाऱ्या नागरिकांवर लक्ष्य ठेवतील. शासनाची परवानगी नसलेल्या व्यक्‍तींना प्रवेश नाकारतील व त्याची माहिती संबंधित तहसीलदार, पोलिस निरीक्षकांना तत्काळ देतील. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com