बुलडाण्यात ‘कोरोना’बाधिताचा मृत्यू; यंत्रणा सतर्क

बुलडाणा: जिल्ह्यात ‘कोरोना’ बाधिताचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा शहराच्या संपूर्ण सीमा बंद करण्यात आल्या असून संबंधित व्यक्ती ज्या भागात राहत होता त्या ठिकाणी संपूर्ण तपासणी युद्धपातळीवर केली जात आहे.
corona infected person dead i buldhana
corona infected person dead i buldhana

बुलडाणा : जिल्ह्यात ‘कोरोना’ बाधिताचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा शहराच्या संपूर्ण सीमा बंद करण्यात आल्या असून संबंधित व्यक्ती ज्या भागात राहत होता त्या ठिकाणी संपूर्ण तपासणी युद्धपातळीवर केली जात आहे. 

बुलडाण्यात शनिवारी (ता. २९) मृत पावलेल्या व्यक्तीचा ‘कोरोना’ रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हा रुग्ण दोन दिवस शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होता.  शनिवारी येथील जिल्हा रुग्णालयात त्याला हलविण्यात आले होते. त्यानंतर तासाभरातच त्याचा मृत्यू झाला. 

मृत ४७ वर्षीय व्यक्ती एका शाळेचा मुख्याध्यापक होता. मागील काही दिवसांपासून आजारी होता. त्यामुळे त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार होत असताना प्रकृती नियंत्रणात येत नसल्याचे पाहून संबंधित रुग्णालय व्यवस्थापनाने या शिक्षकाला जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.  

निमोनिया आणि डायबेटीस या दोन्ही आजारांनी त्रस्त असलेल्या या व्यक्तीचा नंतर एका तासातच मृत्यू झाला. या व्यक्तीचे स्वॉब नागपूरला पाठविण्यात आले होते. रविवारी त्याचा अहवाल जिल्हा सामान्य रुग्णालयाला प्राप्त झाला. हा व्यक्ती ‘कोरोना’ पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. 

शहर पूर्णपणे सील हा व्यक्ती मागील काही दिवसांपासून ‘कोरोना’ग्रस्त आहे. या दरम्यान त्याच्या संपर्कात किती जण आले याचा शोध आता यंत्रणांनी सुरू केला. उपाययोजनांचा भाग म्हणून शहर संपूर्णपणे सील करण्यात आले. नागरिकांच्या ये-जा वर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com