राज्यातील सहकारी संस्थांनी मदतीसाठी पुढे यावे : सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील

सातारा: राज्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. या आपत्तीचे संकट दूर करण्यासाठी राज्यातील सहकारी संस्थांनी मदतीसाठी पुढे येऊन जास्तीत जास्त निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देऊन सहकार्य करावे, असे आवाहन सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी येथे केले.
राज्यातील सहकारी संस्थांनी मदतीसाठी पुढे यावे : सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील
राज्यातील सहकारी संस्थांनी मदतीसाठी पुढे यावे : सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील

सातारा : राज्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. या आपत्तीचे संकट दूर करण्यासाठी राज्यातील सहकारी संस्थांनी मदतीसाठी पुढे येऊन जास्तीत जास्त निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देऊन सहकार्य करावे, असे आवाहन सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी येथे केले. राज्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. याचा परिणाम म्हणून  जगाची आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे. देशातही सर्वत्र उत्पादकता थांबली आहे, उद्योग बंद आहेत, लहान व्यवसायांवर गंडांतर आले आहे. यापूर्वी महाराष्ट्रात आलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये विविध सहकारी संस्था, स्वयंसेवकांनी तसेच दानशूर व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात मदत केली आहे हा आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे.  पतसंस्था, बँका, सहकारी साखर कारखाने, सूतगिरणी, दूध संघ, ऑईल मिल यांच्या माध्यमांतून महाराष्ट्रात सहकाराच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडले आहे. राज्यात ४७५ नागरी बँका, १३ हजार ५५९ नागरी पतसंस्था, सात हजार २५३ कर्मचारी पतसंस्था, २१ हजार ४२५ विकास सोसायटी, ९५ हजार ४६८ सहकारी गृहनिर्माण संस्था, २१५ साखर कारखाने, ६७ सहकारी दूध संघ आहेत. इतक्या संस्थांद्वारे सहकाराचे जाळे राज्यभर पसरले आहे. सहकार कायद्यातही संस्थेच्या नफ्याच्या किती टक्के रक्कम मदत करावी, याची तरतूद आहे. तरी राज्यातील सहकारी संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मोठ्या प्रमाणात मदत करून शासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही मंत्री श्री. पाटील यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com