‘अरुण’ सहकारी संस्थेला सहकारभूषण पुरस्कार

‘अरुण’ सहकारी संस्थेला सहकारभूषण पुरस्कार
‘अरुण’ सहकारी संस्थेला सहकारभूषण पुरस्कार

पुणे (प्रतिनिधी)ः सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या सहकारी संस्थांना राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या २०१७-१८ या वर्षीच्या सहकारमहर्षी, सहकार भूषण आणि सहकारनिष्ठ पुरस्कारांची घोषणा झाली आहे. चंदूर (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील अरुण विविध कार्यकारी सहकारी संस्थेला सहकार भूषण पुरस्कार जाहिर झाला आहे. तर राज्यस्तरीय सहकारी महर्षी पुरस्कार मुंबईच्या ज्ञानदीप ऑप क्रेडिट सोसायटीला जाहीर झाला.    विविध पुरस्कार पुढीलप्रमाणे प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था  सहकारभूषण पुरस्कार ः १) अरुण विविध कार्यकारी सहकारी संस्था, चंदूर. ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर. २) नाटे विविध कार्यकारी सहकारी संस्था, नाटे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी  सहकारनिष्ठ पुरस्कार ः १) सटाणा दक्षिण भाग विविध कार्यकारी सोसायटी, सटाणा, बागलाण, जि. नाशिक. २) नागभीड विविध कार्यकारी सोसायटी, नागभीड, जि. चंद्रपूर. ३) नेरपिंगळाई विविध कार्यकारी सोसायटी, मोर्शी, जि. अमरावती.

जिल्हा मध्यवर्ती बॅंका सहकारभूषण ः रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅंक  सहकारनिष्ठ ः १) दि अहमदनगर डिस्ट्रि्ट को- ऑप. बॅंक. २) चंद्रपूर जिल्हा सहकारी बॅक 

सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्या, दूध संघ  सहकार भूषण ः १)  दि माळेगाव सहकारी साखर कारखाना, बारामती, पुणे.  २) विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना, लातूर  सहकारनिष्ठ ः सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, अमृतनगर, संगमनेर, नगर 

औद्योगिक, हातमाग, यंत्रमाग, उपसा जलसिंचन व इतर संस्था सहकारनिष्ठ ः १)  श्री अन्नपुर्णा पाणीपुरवठा संस्था, केनवडे, कागल जि. कोल्हापूर. २) महामुंबई छत्री उत्पादक सहकारी संस्था, कांजुरमार्ग, मुंबई  फळे, भाजीपाला, खरेदी विक्री,  प्रक्रिया व ग्राहक संस्था सहकार भूषण ः १) हातकणंगले तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, कोल्हापूर. २) प्रवरा फळे भाजीपाला उत्पादक व प्रक्रिया संघ, राहाता,  जि. नगर  सहकारनिष्ठ ः १) कळवा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्था, कळवा, ठाणे. २) चिमूर सहकार तांदूळ गिरणी समिती, जि. चंद्रपूर 

प्राथमिक दूध उत्पादक, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, पशुसंवर्धन संस्था  सहकारभूषण ः १) सहकार महर्षी हणमंतराव दि. पवार सहकारी कुक्कुटपालन सोसायटी, फलटण, सातारा. २) महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघ, मांडवी, कोळीवाडा, मुंबई. ३) सिद्धेश्‍वर सहकारी दूध उत्पादक व्यावसायिक संस्था, अकोले, जि. नगर  सहकारनिष्ठ ः १) अमृतधारा दूध उत्पादक सहकारी संस्था, खरबडी. ता. मातोळा, जि. बुलडाणा. २) गोकुळ दूध उत्पादक व्यावसायिक सहकारी संस्था, खोखरे बोरगाव. ता. जि. बीड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com