रत्नागिरी जिल्ह्यात भात कापणीवेळी शेतकऱ्यांची तारांबळ

शेतात पाणी साचून राहिल्याने कापणी केलेले भातपीक सुकवण्याची अडचण आहे. त्यामुळे पीक कापून सरळ घरी आणत आहोत. यामध्ये अधिक कष्ट करावे लागते. पावसाने तोंडचे पाणीच पळविले आहे. अचानक येणाऱ्या पावसाने तारांबळ उडत आहे. - गंगाराम मोहिते, शेतकरी शनिवारी (ता. २) सकाळी पाऊस नव्हता म्हणून भातशेती कापायला सुरवात केली. पण, काहीवेळातच पावसाने गाठले. कापलेला भात भिजला. दोन तास पडलेल्या मुसळधार पावसाने पंचाईत झाली. मळ्यात साचलेल्या पाण्यात कापलेले भात तरंगत होते. - डॉ. विवेक भिडे,शेतकरी, गणपतीपुळे
रत्नागिरी जिल्ह्यात भात कापणीवेळी शेतकऱ्यांची तारांबळ
रत्नागिरी जिल्ह्यात भात कापणीवेळी शेतकऱ्यांची तारांबळ

रत्नागिरी : पावसाचा जोर ओसरला असला, तरीही लहरी निसर्गामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. अचानक येणाऱ्या पावसामुळे कापलेले भात पीक पाण्यात भिजून खराब होत आहे. पाणथळ शेतात पाणी साचल्यामुळे भात कापणीत अडथळा येत आहे. मंडणगड, संगमेश्‍वरसह रत्नागिरी तालुक्यातील काही गावांमध्ये गुडघाभर पाण्यात उभे राहून भात कापणी करावी लागत असल्याची स्थिती आहे.

क्यार वादळामुळे पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका भातशेतीला बसला आहे. हमखास उत्पन्न देणाऱ्‍या शेतात पाणीच पाणी साचले आहे. भातपीक वाया गेले आहे. उरल्यासुरल्या पिकातून काहीतरी उत्पादन मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी कापणीची कामे वेगाने सुरू केली आहेत. त्यावरही पावसाचे सावट आहे. ग्रामीण भागात दिवसा पावसाचा, तर रात्री जंगली श्वापदांचा त्रास सहन करावा लागत आहे. शेतकरी सकाळी शेतात जात असून ऊन तापायच्या आधी जमेल तेवढी कापणी करीत आहेत. संध्याकाळी हमखास येणाऱ्‍या पावसाच्या सरींमुळे कापलेले पीक दुपारनंतर घरी आणण्यात येत असल्याचे चित्र आहे. 

पीक ओले असल्याने आणायला जड जात आहे. घरी आणलेल्या भातावर प्लॅस्टिक टाकून ते वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ओलसरपणा असल्याने त्याला बुरशी लागण्याचा धोका आहे. त्यामुळे संध्याकाळनंतर घराच्या ओटीवर, मंडपधारी अंगणात आणलेल्या भाऱ्यांची झोडणीसुद्धा सुरू आहे. पाणथळ भागातील पीककापणी करण्याचे आव्हान शेतकऱ्‍यांपुढे आहे.

प्रमाणापेक्षा अधिक पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी उपळटीचे पाणी शेतात साचून राहिले आहे. त्यात कापणी करताना शेतकऱ्‍यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. रत्नागिरी तालुक्यातील पावस परिसरातील नदी किनारी ही अडचण येत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com