औरंगाबादमध्ये केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात कॉँग्रेसचे धरणे

औरंगाबाद : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी (ता. ३) धरणे आंदोलन करण्यात आले.
 Congress protests against Centre's agricultural laws in Aurangabad
Congress protests against Centre's agricultural laws in Aurangabad

औरंगाबाद : केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसह  दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी (ता. ३) धरणे आंदोलन करण्यात आले.

जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर सुद्धा आंदोलने झाली. पदाधिकारी यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आली. 

जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे म्हणाले, ‘‘कॉंग्रेस सरकारच्या काळात कोणत्याही आंदोलनाला सरकारकडून एवढा विरोध झाला नाही. प्रत्येक भारतीयाला लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे. ही भूमिका कॉंग्रेस सरकारने तंतोतंत पाळली. परंतु, केंद्रातील दडपशाही, हुकूमशाही सरकार, शेतकरी आंदोलनावर लाठीमार, पाण्याचा मारा करून आंदोलन दडपत आहे. या काळ्या कायद्यांमुळे शेतकऱ्याचा माल व्यापाऱ्याच्या घशात घालण्याचा मोदी सरकारचा डाव आहे.  दिल्लीच्या सीमेवर चालू असलेल्या शेतकरी आंदोलनास जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करून या आंदोलनास कॉंग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे.’’ 

यावेळी शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, राम शेळके, भाऊसाहेब जगताप, रावसाहेब औताडे, बाबुराव काळे, जगन्नाथ काळे, सुरेखा पानकडे, राहुल सावंत, जयप्रकाश नारनवरे, हमद चाऊस, मोहित जाधव, पवन डोंगरे, सचिन शिरसाठ, गौरव जैस्वाल, इकबाल सिंगगिल, नीलेश अबवाडकेर, कविता शिंदे,  श्‍यामबाबा गावंडे, मनोज शेजूळ, दत्तू काका ठोंबरे, विठ्ठल नाना कोरडे, भास्कर मुरमे, मुज्जफर खान,गणेश चव्हाण,  सुभाष पाटील, पप्पूराज ठुबे, शुभम साळवे, प्रकाश सानप, गणेश खवले, सलीम इनामदार, सचिन शिरसाठ, ब्रानंद खटके, अमजत खान, शेषराव तुपे, बाबासाहेब मोकळे, अरुण शिरसाठ, नीलेश काळे, धर्मराज देशमुख, पंकज सपकाळ, रोहन निकाळजे यांची उपस्थिती होती.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com