`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवले

`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवले
`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवले

बुलडाणा : जलयुक्‍त शिवार अभियानातंर्गत भूजल पातळी वाढविण्यासाठी जल व मृद संधारणाची कामे केली जात आहेत. २०१७-१८ मधील शिल्लक कामे येत्या ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करावीत, २०१८-१९ मधील कामांना कार्यारंभ आदेश देऊन ती प्राधान्याने सुरू करावीत, अशा सूचना राज्याचे मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी दिल्या.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जलयुक्त शिवार, रोजगार हमी योजना कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ब. भि नेमाने, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक, उपजिल्हाधिकारी रमेश काळे आदी  उपस्थित होते.

डवले म्हणाले, जिल्ह्यात भारतीय जैन संघटना यंदाही शासनासोबत गाळमुक्त धरण अभियानात काम करणार अाहे. या संघटनेसोबत सुरू होणारी कामे प्राधान्याने घ्यावीत. एरीया ट्रीटमेंट, गाळ काढणे आदीप्रमाणे कामांचा क्रम असावा. गतवर्षी चांगल्याप्रकारे कामं झाली. यंदाही तेच अपेक्षित असून मोठ्या संख्येने जिल्ह्यातील जलाशये, तलाव गाळमुक्त व्हावी.

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीने किमान पाच कामे सुरू करावीत. यावर्षी जिल्ह्यात दुष्काळ आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या हाताला काम देणे गरजेचे आहे. त्यानुसार रोजगार हमी योजना विभागाने शेल्फवरील कामांची संख्या पर्याप्त ठेवावी. जेणेकरून जास्त मागणी आल्यास कामे पुरविण्यास अडचणी येणार नाहीत, असेही डवले यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com