मळदचा सामूहिक शेतीचा प्रयोग राज्यासाठी दिशादर्शक 

डांळिबाचा १३० एकर क्षेत्रांवर सामूहिक शेतीचा राबवत असलेला प्रयोग राज्यासाठी दिशादर्शक आहे. या शेती सारखा इतर शेतकऱ्यांनी प्रयोग करावा आणि समृद्ध व्हावे
मळदचा सामूहिक शेतीचा  प्रयोग राज्यासाठी दिशादर्शक  Collective farming of Malad Directions for the experiment state
मळदचा सामूहिक शेतीचा  प्रयोग राज्यासाठी दिशादर्शक  Collective farming of Malad Directions for the experiment state

पुणे : ‘‘शेती तोट्याचा व्यवसाय असल्याची ओरड नेहमी होते. मात्र सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दौंड तालुक्यातील मळद येथे डांळिबाचा १३० एकर क्षेत्रांवर सामूहिक शेतीचा राबवत असलेला प्रयोग राज्यासाठी दिशादर्शक आहे. या शेती सारखा इतर शेतकऱ्यांनी प्रयोग करावा आणि समृद्ध व्हावे,’’ असे आवाहन प्रधान कृषी सचिव एकनाथ डवले यांनी केले. 

फॉर्म रोव्हर फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या (पंढरपूर, जि. सोलापूर ) मळद (ता. दौंड, जि. पुणे) येथील सामूहिक शेतीला (करार शेती) शनिवार (ता. १३) रोजी प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी भेट देऊन पाहणी केली. या वेळी डवले बोलत होते. या प्रसंगी डवले यांनी कंपनीच्या १३० एकरांवरील डाळिंब शेतीसह, जिवाणू स्लरी युनिट, सेंद्रिय मल्चिंग, प्रोटेक्शन नेटचा वापर, शेततळे, पंप हाउस आणि पर्जन्यमापक यंत्राची प्रत्यक्षात पाहणी करून माहिती घेतली. 

डवले म्हणाले, ‘‘कृषिभूषण अंकुश पडवळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मळद येथे संघटित शेतीचे उत्कृष्ट मॉडेल विकसित केले आहे. या शेतीला जैविक शेतीची जोड दिली जात आहे. त्यामुळे हा प्रयोग राज्यासाठी राजमार्ग तयार करेल.’’  या वेळी विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर गोटे, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, मंडळ  कृषी अधिकारी कदम यांच्यासह कंपनीचे संचालक कृषिभूषण अंकुश पडवळे, अमरजित जगताप, बापू गडदे, गणेश पारेकर, तानाजी घाटगे, शेतकरी अरुण आटोळे, व्यवस्थापक नीलकंठ जाधव, दीपक गायकवाड, ज्ञानेश्वर औताडे, दीपक गावडे, दामानंद उपस्थित होते. 

प्रतिक्रिया आजच्या काळात शेतीमध्ये परवडत नाही, असे म्हणून चालणार नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत: व्यावसायिक झाले पाहिजे, हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून  आम्ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये नावीन्यपूर्ण ‘काँट्रॅक्ट फार्मिंग’चा प्रयोग यशस्वी करीत आहोत. हा सर्व प्रयोग जैविक शेतीवर आधारलेला आहे. त्यामुळे या  प्रयोगाच्या यशस्वीतेचे पदचिन्हे दिसत असून, येत्या काही दिवसांत आम्ही आणखी ४५० एकर एकरांवर सामूहिक शेती प्रयोग राबवणार आहोत. या करार  शेतीमुळे बाजारातील भाव चढ उताराचा धोका कमी होईल; तसेच शाश्वत भाव मिळेल.  -अंकुश पडवळे, संचालक, फॉर्म रोव्हर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी   

सामूहिक शेतीचे ठळक वैशिष्ट्ये 

  • २०२० ते २०२६ पर्यंत महाधन कंपनीसोबत करार 
  • १३० एकरांवर डाळिंब लागवड (जात- भगवा) 
  • २२ एकरांवर शेवग्याचे आंतरपीक (जात-ओडिसी) 
  • ७० एकरांवर सन बर्न होऊ नये म्हणून प्रोटेक्शन नेटचे आच्छादन 
  • चार एकरांवर शेततळे (६ कोटी २० लाख लिटर पाण्याची क्षमता) 
  • पर्जन्यमापक यंत्राद्वारे पावसाच्या नोंदी 
  • निर्यातक्षम प्रतीचे, रेसीडू फ्री डाळिंब उत्पादन 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com