सिंधुदुर्गात ढगाळ वातावरण कायम

सिंधुदुर्गात ढगाळ वातावरण कायम
सिंधुदुर्गात ढगाळ वातावरण कायम

सिंधुदुर्ग  ः  सिंधुदुर्गात गेले दोन तीन दिवस ढगाळ वातावरण आहे. या वातावरणामुळे आंबा, काजू बागांवर कीडरोंगाचा प्रार्दुभाव वाढत आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात सुरू झालेली ढगाळ वातावरणाची मालिका अखंडपणे सुरू आहे. जिल्ह्यात पुन्हा एकदा ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. सातत्याने ढगाळ वातावरण निर्माण होत असल्यामुळे त्याचा मोठा परिणाम आंबा, काजू पिकांवर होताना दिसत आहे. काही शेतकऱ्यांच्या काजू तयार होऊ लागल्या आहेत तर काहींच्या बागांना आता मोहोर येण्याची प्रकिया सुरू आहे. या बागांवर मोठ्या प्रमाणात कीडरोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे आंबा पीकदेखील धोक्यात आले आहे. यावर्षी आंबा हंगाम मुळतःच लांबणीवर पडणार आहे. त्यात देवगड, मालवण, वेंगुर्ला या तालुक्यांत एखादा अपवाद वगळला तर काही बागायतदारांच्या झाडांना मोहोर फुटू लागला आहे. ढगाळ वातावरणामुळे त्यावर देखील कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. त्यामुळे यावर्षी पाऊस संपल्यापासून सुरू झालेली ढगाळ वातावरणाची मालिका संपण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे शेतकरी मात्र चिंताग्रस्त आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com