नवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रयान मोहीम सफलतेच्या मार्गावर असून ‘चांद्रयान २'ने मंगळवारी चंद्राच्या पहिल्या कक्षेत यशस्वीरीत्या प्रवेश केला. ‘इस्रो'च्या शास्त्रज्ञांनी मंगळवारी सकाळी ८.३० ते ९.३० च्या दरम्यान ‘चांद्रयान २'ला चंद्राची LBN#१ या कक्षेत पोचविले. ‘चांद्रयान २' आता चंद्रापासून किमान ११८ किलोमीटर आणि कमाल १८०७८ किलोमीटर दूर असलेल्या अंडाकृती कक्षेत पुढील २४ तास फिरणार आहे. या दरम्यान चांद्रयानाचा वेग १०.९८ किलोमीटर प्रतिसेकंदावरून कमी करून १.९८ किलोमीटर प्रति सेकंदापर्यंत कमी केला आहे. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली येऊन चंद्राशी टक्कर होऊ नये म्हणून हा वेग कमी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ‘चांद्रयान २'चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणे हे ‘इस्रो'च्या शास्त्रज्ञांपुढे आव्हान होते. ७ सप्टेंबरला ‘चांद्रयान २' चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. हे ऐतिहासिक घटनेचे थेट प्रक्षेपण पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चांद्रयान चंद्राच्या कक्षेत पोचल्याने नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून ‘इस्रो'च्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. हृदयाचे ठोके थांबले ः सिवन ‘चांद्रयान २'ला चंद्राच्या कक्षेत स्थापन करण्याच्या वेळी आमच्या हृदयाचे ठोके जणू थांबले होते,' अशा शब्दांत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष के सिवन यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या. ‘चांद्रयान २'ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. भारतीय शास्त्रज्ञांच्या या यशस्वी कामगिरीनंतर सिवन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. चंद्रावर स्वारीचे टप्पे
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.